2014 पासून अण्णा हजारे देशासाठी संपले….

        एकेकाळचे अण्णा हजारे म्हणजे लोकशाहीचे खंदे समर्थक,भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ,खरे देशभक्त,जंतर मंतर आणि आझाद मैदानाचे कैवारी,लोकपाल आयोगाचे निर्माते,माहिती अधिकाराच्या कायद्याचे निर्माते,एकंदरीत असे वाटत होते की……

आदरणीय टी.एन.शेषन…

     नंतर या देशाला,लोकशाहीला आणि संविधानाला रक्षक मिळाला…..

       तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या सरकार विरोधात,भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात,संसद आणि विधीमंडळाकडून कायदे बनवून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने जनतेची बाजू घेऊन आंदोलने, आमरण उपोषणे करुन केंद्र सरकारची झोप उडवून देणारे ( ज्याप्रमाणे मनोज जरांगे महाराष्ट्रात शिंदे सरकारची झोप उडवून देत होते ),सरकारला सळो की पळो करुन सोडणारे…..

आदरणीय अण्णा हजारे आपण 2014 पासून गप्प का?

     काय? 2014 पासून देश भ्रष्टाचार मुक्त झाला म्हणून?….

    की देश काँग्रेसमुक्त झाला म्हणून?….

      का?.. RSS / भाजप / मोदी – शहाला सत्तेत बसविण्याचे कर्तव्य पूर्ण झाले म्हणून…..

       एकंदरीत मनुवादी / मनुस्मृतीचे वारे जोरात वाहवण्यासाठीचे मनसूबे आणि लोकशाही संपविण्याचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून…..

   अण्णा यांनी मौन धारण केले का?

        600 दिवसापासून मणिपूर जळते आहे,तेथे तुमच्याप्रमाणेच कधीकाळी भारतीय सैन्यात असणाऱ्या आणि कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सहचारिणीची दीडशेच्या वर जमाव नग्न धिंड काढून अत्याचार करतो पण तरी सुद्धा अण्णांचे उपोषण किंवा आंदोलन मोदी – शहाच्या विरोधात का नाही..?

     बदलापूर प्रकरणात सुद्धा महाराष्ट्रा सरकारचा कधी अण्णांकडून निषेध का नाही?

       2014 पूर्वी राळेगण सिद्धीच्या गाभाऱ्यात कधी सहसा दिसत नसत…..

       आज त्या गाभाऱ्याच्या बाहेर का पडत नाहीत……?

     आम्ही ( भारतीय जनता ) तुमचे वयोमान आणि प्रकृती समजू शकतो.परंतू ,…

    डॉ.बाबा आढाव वयाच्या 95 व्या वर्षी आम्हाला प्रेरणाच नव्हे तर आमचा आत्मविश्वास द्विगुणित करतात…

अण्णा तुम्ही!

      आम्ही आपल्याला 21 व्या शतकाचे म.गांधी समजत होतो…

       पण तुम्ही RSS वादी,मनुवादी,भ्रष्टाचाऱ्यांचे खंदे समर्थक,संविधानविरोधी शक्तीला केंद्रात सत्तेवर बसविण्यासाठीच एवढा आटापिटा केला का काय अशी शंका आम्हाला येत आहे!

     ती शंका आमच्या मनातून घालवायची असेल तर या मोदी – शहाला खुर्चीवरून हाकलून लावण्यासाठी आणि EVM ला देशातून हद्दपार करण्यासाठी शेवटचे आंदोलनाचे हत्यार उपसा…..

    तरच तुमच्या जीवनाचे सार्थक होईल……

अन्यथा……..

      आम्ही ( भारतीय जनता ) तर हे काम करणारच आहोत,ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीच.

     पण तुमचा गांधीवादी इतिहास पुसून जाऊन मनुवादी होईल!

     अन्यथा आम्हाला दुर्दैवाने म्हणावे लागेल 2014 लाच अण्णा संपले!

*****

जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689