
रोहन आदेवार
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ/वर्धा
नागपूर येथे आयोजित आय डिजाईन एक्ससिलन्स अवॉर्ड मध्ये देवळीतील चित्रा जावंधिया यांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
वास्तूशास्त्रतील ज्ञान,इंटेरिएअर डीजाइनर,बिना तोडफोडची वास्तू आणि लोगो डिजाईनच्या माध्यमातून संपूर्ण भारतात त्यांनी अवलौकीक नाव कमिविले आहे.
याचीच पोच पावती म्हणून त्यांना नागपूर येथे सन्मानित करण्यात आले.
डॉ. चित्रा जवांधिया यांचे सत्कार करताना ना.नितीन गडकरी..
माहेश्वरी महिला मंडळच्या डॉ.चित्रा जावंधिया या वर्धा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.नितीन गडकरी यांनी सुद्धा त्यांचे कौतुक करताना सांगितले की देवळी सारख्या छोट्या गावातून येऊन एक महिला सुद्धा वस्तूशास्त्र तज्ञ बनू शकते आणि संपूर्ण भारतात आपलं नाव अवलौकीक करू शकते.
डॉ.चित्रा यांनी दैनंदिन जीवनात वास्तुशास्त्राचे महत्व पटवून सांगितले.संपूर्ण भारतात साइंटिफिक लोगो बनवणारे मात्र 100-150 वैज्ञानिक आहेत.
त्यात पहिल्या 50 वैज्ञानिका मध्ये डॉ.चित्रा जावंधिया यांचा समावेश आहे.घराची तोडफोड न करता वास्तुदोष कसा दूर करू शकतो या बदल त्यांन भाषणातून माहिती पुरविली.