विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन.. — विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन” माहिती जाणून घ्या…

▪️धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर गुणानंद, सुमंगल, बौध्द विव्दान जी. आर. डिसिल्वा इत्यादिनी विश्व बौद्ध धम्म ध्वजाची निर्मिती केली.

▪️ यात मिळून निळा,पिवळा, लाल,पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौध्द ध्वजा’ ची निर्मिती केली आहे.

▪️ कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली. याला पाली भाषेत ‘षडरोशनी ध्वज’ किंवा ‘धम्म ध्वज’ असे म्हणतात.

***

धम्म ध्वजातील पाच रंगांचे अर्थ..

१) निळा : शांती व प्रेमाचे प्रतीक

२) पिवळा : तेज व उत्साहाचे प्रतीक

३) लाल : शौर्य व धैर्याचे प्रतीक

४) पांढरा : शुध्दता व निर्मळतेचे प्रतीक

५) केसरी : त्याग, दया व करुणेचे प्रतीक

***

धम्म ध्वज फडकवण्याचे नियम..

▪️ प्रमाण उभे ५० सें. मी. व आडवे ७० सें. मी. आहे.

▪️ ‘धम्म ध्वज’ बौध्द जनांनी

आपले घर,विहार,स्मारक,भवन,धम्म परिषद,धम्म सभेचा मंच धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी ठिकाणी सर्वांत उंच असेल असा फडकवावा.

▪️ ‘धम्म ध्वज’ बुध्द पोर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन,धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी.

▪️ हा ‘धम्म ध्वज ‘बुध्द पोर्णिमा’, धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्मक्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी.

▪️ प्रत्येक बौध्द व्यक्तिने धम्म ध्वजाचा सन्मान व अभिमान बाळगावा.

          सर्व बौद्ध बांधवांना ‘ जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिनाच्या मंगलमय कामना..

             शुभेच्छुक 

         आयु.प्रशांत चव्हाण सर.

                केंद्रीय शिक्षक

             भारतीय बौद्ध महासभा

                  श्रीगोंदा तालुका