— सर्व सन्माननीय भारतीय सर्वसामान्य नागरिक,बंधू-भगिनी,माता-पिता,बालक बालिका,तसेच सर्व व्हाट्सअप ग्रुप वरील सर्व सदस्य..
सप्रेम नमस्कार,सलाम वालेकुम,जय भीम,त्रिवार वंदन, आणि नतमस्तक…
आज 2020 च्या काळात कोरोणाच्या प्रादुर्भावाने आपणा सर्वांचा एक प्रकारे मानसिकरित्या पुनर्जन्म झालेला आहे….. !
आपण दिशाहीन व दशा ग्रस्त झालो आहोत……!
देशाची शक्ती म्हणजे युवा पिढी सैरभैर (मानसिकरीत्या) झालेली आहे…..!
यामधून कोणीही सुटलेले नाहीत…… !
गरीब-श्रीमंत,प्रत्येकाचे कमी अधिक प्रमाणात मानसिक व शारीरिकदृष्ट्या खच्चीकरण या कोरोणामुळे झाले आहे…..!
केंद्र सरकार व राज्य सरकारे या कोरोनाच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत…..!
परंतू,त्यात यश येत नाही……!
प्रारंभीचे सर्व उपाय निष्फळ गेल्यामुळे संपूर्ण जग कोरणामय झाले आहे…..! त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे…..!
त्यामुळे आपल्या देशाची व महाराष्ट्र राज्याची तिजोरी या रोगासाठी रिकामी होत आहे,असे दिसते.ही परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा येईल.परंतु,त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रात दूरगामी ठरत आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष डळमळीत झाले आहे…..!
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हाताला काम राहिलेले नाही….!
जगाच्या पोशिंद्याच्या शेतातील मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उलाढाल ठप्प आहे……!
केंद्र व राज्य सरकारी नोकरदारांचे पगार वेळेवर व संपूर्ण होत नाहीत….. !
एकंदरीत अशा परिस्थितीत आपणा सर्वांना आपल्या विवेक शक्तीच्या बळावर,आत्मविश्वासाच्या बळावर या संकटाच्या मानेवर पाय देऊन “गरुडझेप घेणे ” हा एकमेव पर्याय उरला आहे……!
त्याचाच अविष्कार करण्याची जबाबदारी प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकावर आहे येऊन ठेपलेली आहे……!
कारण परिस्थितीच्या अधीन (शरण) जर आपण गेलो तर ती आपल्याला संपवून टाकेल…..!
आणि जर तिच्या मानेवर आपण पाय दिला तर ती आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही….. !
हाच जगाचा इतिहास आहे….. !
त्यासाठी आपल्याला व्हाट्सअप ग्रुप, यूट्यूब चैनल, गुगल,या सर्वप्रकारच्या प्रसार माध्यमांचा उपयोग चांगल्या कृतीसाठी करून घ्यायचा आहे. आपल्याकडे प्रत्येक जण प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे….. !
परंतु त्यांची शक्ती प्रदर्शित करण्यासाठी आपल्याकडे “प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया “आहेत ज्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर समाजात आहे.परंतु “प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया” कृत्रिम रीत्या बनलेल्या गरीब श्रीमंतीच्या दरीतील विषमता वाढविण्यासाठीच टपलेली आहे…… !
यातील श्रीमंताच्या घरची,चित्रपट सृष्टीची आणि राजकीय पक्षांच्या राजकारण्यांची वरील मीडिया रखेल बनलेली आहे,त्यामुळे आपल्याला यामध्ये वाव नाही…..!
म्हणून आज आपल्या हातात जी वरील प्रकारची समाज व प्रसार माध्यमे आहेत त्यांचा पुरेपूर चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे परिवर्तनासाठी थोडक्यात वैचारिक क्रांती साठीच माध्यमांचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे आणि जागृती करावयाचे आहे….. !
नाहीतर एक वेळ अशी येईल ही सर्व प्रसार माध्यमे सरकारने कायमची जर बंद केली तर…… !
त्यासाठी याचा वापर जन्मदिनाच्या शुभेच्छा,भावपूर्ण श्रद्धांजली,एखाद्या गीताचा प्रसार,काहीतरी अनावश्यक अश्लील बाबींचा प्रसार,आपल्या माताभगिनी साठी निंदनीय कृतीचा प्रसार,अशा अनावश्यक व कुचकामी गोष्टीचा प्रसार करून आपण कोणता मोठा तीर मारणार आहोत?
जगातील महापुरुषांनी, तत्त्वज्ञांनी,संशोधकांनी,मानवी हक्कासाठी ज्यांनी जीवनाचे योगदान दिले,त्या सर्वांकडे अशा फालतू गोष्टीसाठी सवड होती का……?
जर वरील प्रकारच्या कोरोणाच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीचे वेळीच गांभीर्य ओळखून आपण जागृत होऊन योग्य कृतीमध्ये आपल्यात बदल केला नाही तर,आपले (संकट सर्वच प्रकारचे) जवळ आले आहे.त्यानंतर मात्र पश्चातापाशिवाय आपण काहीही करू शकणार नाही हे लक्षात ठेवा.
तुम्ही एखादा लेख,कथा,कविता किंवा परखड मत असलेली बातमी किंवा पत्रकारितेच्या जागृतीची लेखनशैली तुम्ही प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे घेऊन जा,ते घेताना घेतील परंतु कचराकुंडीतच टाकतील,तुम्ही फक्त वाट पाहत राहा ते प्रकाशित होण्याची.
ते कधीच प्रकाशित करणार नाहीत किंवा दाखवणार नाहीत.अशी षंढ व नेभळट ही मीडिया झालेली आहे…….
तर मग एवढे समाज व प्रसार माध्यमे आज आपल्या हातात (मोबाईलद्वारे) आहेत त्याचा सदुपयोग का करू नये…..?
हा बदल आज,आता,ताबडतोब या क्षणापासून झालाच पाहिजे अन्यथा..
लेखक
अनंत के.भवरे
(औरंगाबाद 7875452689)