
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
विश्वास बसनार नाही,परंतू चिमूर विधानसभा क्षेत्रातील बिजेपी पक्षाचे आमदार बंटी भांगडीया यांच्या मतदारसंघात असा प्रकार घडला आहे.
बोडधा ग्रामपंचायत येथे काही लोक रोजगार हमीच्या कामावर गेले नाही तरी त्यांना कामाचे पैसे मिळाले आहे.
बोडधा ते खुटाळा खड्डीकरण रस्ता हा ७२० मिटर अंतरचा आहे.हे काम २३ लाख रुपयांचे असून रोजगार हमी योजनेतून केले आहे.हा रस्ता गावातील कामगारांनी बनवला असे सांगितले जात आहे.
मात्र,हा रस्ता एखाद्या जेसीबी मशीनने केल्यासारखा वाटतो आहे.हा कामगारांनी बनवला आहे यावर विश्वास बसत नाही.
पण आश्चर्याची बाब असी की रस्त्याच्या कामावर गावातील खुद्द महिला संरपच व एक वृद्ध महिला असल्याचे मस्टूर सांगते आहे.सदर कामाच्या गैर प्रकाराची तक्रार उपसरपंच सदाशीव घोनमोडे यांची आहे.
सदर झालेल्या कामाची चौकशी करून सरपंच व संबधीत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी व शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा आशयाची मागणी उपसंरपच सदाशीव घोनमोडे यांनी केली आहे.