कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील मेहंदी गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी पारशिवनी पोलीसात तक्रार दाखल करून आम्हाला कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आर्थिक लुबाडणूक काही युवकांनी केली असल्याची तक्रार दिली आहे.
पारशिवनी तालुक्यातील ग्राम मेहंदी येथील महिला बचतगटांतील महिलांना विस्वासात घेऊन दिंनाक २९/१२/२०२२ दोन यूवक गावात आले. यावेळी ते एम. एच. ४९ ए. डी. ५५९७ नंबरची स्पेंलडर गाडी होती. व एम. एच. २७ डी. जी. ४०६१ नंबर ची गाडी. त्यांचा मो. क्रंमाक ६३५५०४४७२४ आहे.
यावेळी या युवकांनी महिला बचत गटाच्या महिलांची सभा घेतली व सावनेर येथील बॅक. मार्फत तुम्हाला कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.कर्ज मिळण्यासाठी प्रत्येक महिलांनी करारनामा करण्यासाठी ३ हजार रुपये रोख द्यावी व एका आठवड्यात प्रत्येकी ८० हजार रुपये रोख कर्ज मिळेल असे आश्वासनही त्यांनी दिले व निघून गेले.
पुन्हा ३१ डिसेंबर २०२२ ला मेहंदी गावात दाखल झाले व महिला बचत गटाच्या महिलांना एकत्र बसून त्यांच्या कडून प्रति महिला ३ हजार रूपये प्रमाणे १५ महिलांची ४५ हजार रुपयांची रक्कम जमा केली.
त्यावेळी राकेश पाटील मोबाईल फोन नंबर ९३७३२७६७९१ व आकाश नाव असलेला रामटेक येथील युवक व त्यांचा मोबाईल फोन नंबर ६३५५०४४७२४ हा युवक गाडी नंबर एम. एच. ४९ ए. डी. ५५९७.या गाडीने जमा केलेले ४५ हजार रुपये घेऊन गेले असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले.
त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर आता आम्ही महिला फोन करित आहे पण ते प्रतिसाद देत नाही. त्यामुळे सदर युवकांनी आमची फसवणूक केली असल्याचे वाटत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
महिला बचत गटाच्या महिलांनी पारशिवनी पोलीसात तक्रार नोंदवली आहे.पारशिवनी तालुक्यातील ईतर गावातील महिला बचत गटाच्या महिलांची या युवकानी लाखो रुपयांची आर्थिक लुबाडणूक केली आहे. पण काही महिला बचतगटांतील महिला पोलीसात तक्रार दाखल करण्यास पुढे आल्या नसल्याचे कळते.
यांच गोष्टींचा पुरेपुर फायदा घेऊन हे ठंगबाज महिला बचत गटांना व ग्रामीण भागातील गरजू लोकांना भेटून कर्जाचे आश्वासन देऊन हजारो रुपयांची आर्थिक लुट करीत असल्याचे दिसून येते आहे.पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागासह आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक गावात शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन हॉईट काॅलर दरोडेखोर गरिब व गरजू व लाभार्थी कुंटूबियाना घेरून शासकीय योजनांची माहिती देतात व लाभ मिळवून देण्यासाठी पैसाची मागणी करतात.
त्यामुळे आता पोलिसांनी दक्ष होऊन या हाॅईट काॅलर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळने ही आजची गरज आहे.
( शासकीय योजनांच्या नावाने. आर्थिक लुट करणारे का झाले संक्रिय.)
शासनाच्या व आदिवासी विकास विभागाच्या व. कृषी विभागाच्या. अनेक योजना आहेत पण त्या योजना ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक गावात पोहचवून त्यांचा प्रचार व माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचार्यांनी गरिब व लाभार्थी यांना करुन देणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत योजनांची सनद जाहीर करण्यात आली पाहिजे. मात्र अशा कोणत्याही विभागाचे वतीने लोकजागृती केली जात नाही. व एखादा लाभार्थी योजनांची माहिती किंवा लाभ घेण्याकरिता पंचायत समिती व ईतर कार्यालयात गेलाच तर त्याला अधिकारी व कर्मचारी सन्मानपूर्वक वागणूक देत नाही.म्हणूनच शासकीय योजना असून सुद्धा ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील लोकांना त्याचा लाभ मिळवून घेण्यासाठी दलालांची मदत घ्यावी लागते.
यांच कारणाने त्यांची आर्थिक लुबाडणूक काही युवकांनी करणे सुर केले आहे.
ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक गावात शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आर्थिक लुबाडणूक करण्यात अग्रेसर असलेल्या टोळ्यांचे खरे सुंत्रधार त्या त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी तर नाही ना?