कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी : डुमरी कला शेत शिवार येथील शेतात ठेवलेल्या धानापैकी चोरट्याने ३२ पोते म्हणजे २९ क्विंटल धान चोरून नेले असल्याची धक्कादायक घटना घडली.त्या धानाची एकूण किंमत ६० हजार रुपये असून,ही घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डुमरीकला शिवारात मंगळवारी ( दि . 3 ) मध्यरात्री घडली.
पोलिस सुत्राव्दारे मिळालेल्या माहीती नुसार शेताचे मुनिम तक्ररारदार उमेश वासुदेव घोडागाडे वय ३६ वर्ष राहणार डुमरी हे दिवाणजी म्हणुन काम करतात.त्यांचे शेत डुमरीकला गावाला लागून असून त्यांच्या शेतीच्या देखरेखीचे काम तक्रारदार दिवानजी करीत आहेत.
शेतीला चारही बाजूने तार फेंसींग केलेली असून लोखंडी गेट लागलेले आहे.त्या शेतामध्ये धानाचे पिक घेतले असून 15 ते 20 दिवसापासून धान काढून शेतात ठेवले होते.त्यापैकी 63 बोरे मिलींगसाठी मागील हप्त्यामधे नगरर्धन येथे पाठवले होते.
उर्वरित 60 बोरे धान रचून ताडपत्रीने झाकून शेतात मोकळ्या जागेत ठेवले होते.मंगलवार दिनांक 03/01/2023 रोजी रात्री 09/00 वा चा दरम्यान दिवानजी हे शेतात फेरफटका मारायला गेले तेव्हा शेतात ठेवलेले धान व्यवस्थीत जशाचा तसे ठेवलेले दिसले व गेटला कूलूप लागलेले दिसले.
बुधवार दिनांक 04/01/2023 रोजी सकाळी 07/00 वा चा दरम्यान तक्रारदार दिवाणजी शेतात देखरेखी खाली असलेल्या विजयवर्गीय यांच्या मालकीच्या शेतात फेरफटका मारण्यास गेलो असता तेथे ठेवलेले धानाचे पोत्यांपैकी 32 बोरे धान कमी दिसले.तसेच त्या ठिकाणी अज्ञात पिकअप गाडीचे चक्के उमटलेले दिसले.
शेतात ठेवलेले धानाचे बोरे कोणीतरी अज्ञात चोराने शेताला लावलेले गेटचे कूलूप तोडून शेतात मोकळ्या जागेवर ठेवलेले धानाचे एकूण 32 बोरे अंदाजे 29 क्वींटल किंमती 60,000 रूपयाचा दिनांक मंगलवार ३/०१/२०२३ चे रात्री ९/०० ते बुधवार दि 04/01/2023 चे सकाळी 07/00 वा चे दरम्यान चोरून नेले.
मंगळवारी रात्री शेतात कुणीही नसल्याचे पाहून चोरट्याने कुंपणाच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि शेतातील २ ९ क्विंटल ३२ पोते धान चोरून नेले.
ही बाब लक्षात येताच दिवानजी उमेश घोडमारे यांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.त्या धानाची एकूण किमत ६० हजार रुपये असून ते ३२ पोत्यांमध्ये भरले होते असेही त्यांनी पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी अपराध क्रमाक ०३/२३ ने दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.गुन्हाचा पुढील तपास पो.उपनिरिक्षक करित असून वाहनासह आरोपीचा शोध घेत आहेत.