नीरा व भीमा संगमाच्या पवित्र स्थानी भक्त प्रल्हादांना सुद्धा एवढ्या मोठ्या सोहळ्याचा आनंद झाला आसावा…  — ह.भ.प उध्दव महाराज मंडलीक कर्तन सेवे प्रसंगी बोलत होते…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळा चालु असून दुसरी कीर्तन सेवा ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांची झाली आहे.

          700 ते 800 टाळकरी कीर्तन सेवेसाठी रोज आसतात व 5 ते 6 हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आजी-माजी सरपंच उपसरपंच तसेच आळंदी व देहू संस्थांचे सर्व पदाधिकारी या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सप्ताहासाठी उपस्थित दररोज किर्तन सेवेसाठी आहेत.

                सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज रणखांबे विणेकरी वेदमूर्ती आनंद काकडे काका तर श्री शेत्र निरा नरसिंहपुर सप्ताह कमिटीच्या वतीने परीसरातील शंभरहून अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे.

               सप्ताहासाठी मंगळवार दिनांक 31/ 10 /2023 रोजी ह भ प महामंडलेश्वर जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची कीर्तन सेवा आहे. हा अभिष्टचिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी दररोज आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्त व श्रोते यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा ही दररोज देण्यात येत आहे. व आनंदाने याचा लाभ भाविक घेत आहेत.

        बुधवार दिनांक 1/ 11 /2023 रोजी श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले धामणगाव यांची कीर्तन सेवा होईल.

गुरुवार दिनांक 2/ 11/2023 रोजी श्रीगुरु केशव महाराज नामदास पंढरपूरकर यांची कीर्तन सेवा होईल.

        शुक्रवार दिनांक 3/11/2023 रोजी ह भ प श्री गुरु योगीराज महाराज गोसावी पैठण यांची कीर्तन सेवा होईल.

          शनिवार दिनांक 4/ 11/2023 रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम क्षेत्र आळंदी यांची कीर्तन सेवा होईल.

               शेवटी रविवार दिनांक 5/11/2023 रोजी लक्ष्मी नरसिंहच्या पावन भूमीमध्ये संपूर्ण गाव दिंडी प्रदक्षिणा टाळ आणि मृदंगाच्या आवाजात घेण्यात आल्यानंतर सकाळी 9 ते11 या वेळेत श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होईल व सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देऊन सप्ताहाची सांगता होईल.