कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान : – प्रोअक्टिव अबॅकस नॅशनल कंपिटेशन मध्ये जेनियस प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस चे गोंडेगांव व वराडा येथील तेरा विद्यार्थी ट्रॉफी विजेता ठरले तर दहा विद्या र्थीनी स्वर्ण पदक पटकाविले. सहा मिनिटात शंभर गणित सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. यामुळे परिसरातुन विद्यार्थ्याचे कौतुक, अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव करण्यात येत आहे.
अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत विदर्भातुन जेनियस प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस चे गोंडेगांव येथील कु. श्रावणी प्रमोद गजभिये, कु अंशा प्रमोद गजभिये, कु लविष्का प्रेमदास गि-हे, कु मृणाली जिवलग पाटील, कु विधी विजय मेश्राम, मयंक शैलेश बरोले, कु आशना संदीप मंडपे, कु स्वर्णा सुनील धुसिया, कु संस्कार मुकेश चौधरी, कु दीक्षांत हर्षवर्धन कांबळे तर वराडा येथील आराधना विनोद जामदार, कु श्रावणी बालक घोड़मारे, कु श्रेया प्रविण चिखले, कु पूर्वी सचिन चिखले, कु अवनी प्रमोद चिखले, कु वाणी प्रशांत चरड़े, कु कादंबरी नरेंद्र शेळकी, कु केतकी संजय राउत, कुणाल आशाराम चिखले, वंश खुशाल शेळकी, कु गार्गी कपिल गवते, कु प्रांजली राजेश पाटिल, आरव राहुल मेश्राम असे २३ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली तर १० विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले. यातील १५ विद्यार्थ्यांची (दि.५) फेब्रुवारी ला पुणे येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धे करिता निवड झाली आहे. या स्पर्धेत अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा, चंद्र पुर, वर्धा, बुलढाणा, वाशीम, नागपुर तसेच मध्य प्रदेशा तील असे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . सदर कार्यक्रमास श्री गिरीश करंडे सर, तेजस्विनी सावंत, अजय मनियार सर, सारिका करंडे डायरेक्टर प्रोॲक्टिव अबँकस मुंबई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान परिसरातुन विजेता जेनियस प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस च्या शिक्षिका स्वाती गजभिये सह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुणे येथील आंतर राष्ट्रीय स्पर्धे करिता निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशा करिता शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.