ब्रेकिंग न्यूज…नरचुली पिपरटोला परीसरात हत्तीचा कळप दाखल…  — नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. 

प्रितम जनबंधु

    संपादक 

       आरमोरी तालुक्यातील अगदीच शेवटच्या टोकावर असलेल्या नरचुली पिपरटोला येथील शेतशिवारात हत्तीचा कळप दाखल झाला असुन वनविभागाची रेस्कु टिम दाखल झाली आहे. गेल्या ७ ते ८ दिवसांपासून सदर हत्तीचा कळप सभोवतालच्या परीसरात वावरत असल्याने त्यावर पी-जीपीएस सॅटेलाईट द्वारे पाडत ठेवण्यात येत आहे. 

          चातगाव, मौशीखाब, रांगी, वनखेडा, पिसेवडधा, वानरचुवा, शेतशीवार तसेच जंगल परीसरातुन वहिवाट करीत नरचुली पीपरटोला शेतशिवारात हत्तीचा कळप आज सायंकाळच्या सुमारास दाखल झाल्याची घटना पी-जीपीएस सॅटेलाईट कॅमेर्‍याद्वारे घेण्यात आलेल्या व्हिडीयो क्लिप वरुन समोर आली आहे. पीपरटोला गावापासून सरासरी ५०० मीटर अंतरावर सदर हत्तीचा कळप असल्याचे समजते. यामधे अंदाजे १७ ते १८ हत्ती समुहाने असल्याचे व्हीडिओ क्लिप द्वारे दिसुन येत आहे.

         गावातील नागरीकाना कसल्याही प्रकारची हानी होऊ नये, हत्तीचा कळप गावात येऊ नये याकरिता वनवीभागाची टिम हजर झाली असुन हत्तीच्या कळपावर पाडत ठेऊन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यामधे एस. आर. रामगुड्डावार वनपाल, एम एम राऊत वनरक्षक, तसेच वनविभागाची चमु सोबतच आर आर टीम गडचीरोली याचे मार्फतीने रेस्कु अभियान राबविला जात आहे.

              सदर हत्तीच्या कळपाने धानाचे पुंजने अस्ताव्यस्त केले असुन उभे पीक पायदळी तुडवत सबब शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पीपरटोला येथील रहिवासी हत्तीचा कळप दाखल झाल्याने भयभीत झाले असुन गावाच्या मुख्य ठिकाणी एकत्र येऊन होडी पेटवून जागरण करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

          हत्तीचे कळप परीसरात दाखल झाल्याची सुचना वनविभागाकडुन देण्यात आली असुन योग्य काळजी घेतली जावी, एकट्याने जंगल परीसरात जाऊ नये अशी सुचना नागरीकांना देण्यात आली आहे. वानरचुवा, वनखेडा परीसरातील काही शेतकऱ्यांच्या शेत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असुन काही शेतकऱ्याचे शेतीचे पंचनामे करणे सुरु आहे. अशी माहीती रांगी वनपरीक्षेत्राचे वनपाल एस. आर. रामगुड्डावार यांनी दिली आहे.