नीरा नरसिंहपूर दिनांक: ८
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूक २०२३ बिनविरोधी झाली. ग्रंथालय व वाचनालय सभेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप हांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडल्या
जिल्हा कार्य कारणी मध्ये इंदापूर तालुक्यातील अंबादास कवळे तर तालुका अध्यक्ष पदी माजी सरपंच श्रीकांत बोडके यांची निवड करण्यात आली. निवडी प्रसंगी श्रीकांत बोडके बोलत आसताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला तालुका अध्यक्षपदी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचे योग्यरित्या पालन करून गाव तिथे ग्रंथालय करण्याठी नेहमीच प्रयत्नशील राहणार. त्यांना निवडीचे पत्र विजय कोलते यांच्या हस्ते देण्यात आले. पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक साधारण सभा नाना पेठेत शिक्षण भवन येथे संपन्न झाली. संघाचे मुख्य कार्यकारी मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी आध्यक्ष विजय कोलते यांच्या अध्यक्षते खाली सभा झाली. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय व वाचनालय संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण कार्यवाहक सोपानराव पवार सचिन सपकाळ, विजय गायकवाड, नामदेव बोडके, पांडुरंग बोडके, माऊली निंबाळकर, संतोष सुतार, सुदर्शन बोडके, रमेश मगर, सोमनाथ बोडके, आधी उपस्थित होते त्यांच्या पदाचा कार्यकाल २०२३ ते २०२६ आसा आसून सदर काळात ग्रंथालय चळवळीचे कार्य तालुक्यात करून गाव तिथे ग्रंथालय सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या व ग्रंथालय चळवळीच्या व सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासाला पोषक असे कार्य करणार असल्याचे श्रीकांत बोडके यांनी निवडी प्रसंगी सांगितले.