बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी आज मुंबई येथील विधानभवनात सलग तिसऱ्यांदा इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाची शपथ घेतली.
विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झालेले श्री कालिदास कोळंबकर यांनी गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब तसेच सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य उपस्थित होते.
हा शपथविधी विधान भवन मुंबई येथे पार पडला. दत्तात्रेय मामा भरणे यांचा विधानसभा सदस्य म्हणून आज शपथविधी कार्यक्रम पार पडला.
इंदापूर तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनीं यांनी भरघोस्य मतदान करून विजय मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.