जेंव्हा जेंव्हा सार्वजनिक व्यवस्था आपल्या संविधानिक विज्ञानवादी,विवेकवादी,मानवतावादी मार्गांवरून भरकटून दिशाहीन होऊन सैरभैर होते….
तेंव्हा तीला पूर्वपदावर आणण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावेच लागते.याचा अनुभव आपण फ्रेंच राज्यक्रांतीत,अमेरिकन राज्यक्रांतीत,अमेरिकेन यादवी युद्धात जगाने घेतला.
अमेरिकेत तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या अवघ्या 75 वर्षात लोकशाही मूल्यांच्या विरोधात असलेल्या “काळ्यांच्या गुलामीच्या ” अविष्कारितेसाठी दक्षिण आणि उत्तर अमेरिका अशी दोन शकले पडली.यात उत्तर अमेरिकेला लोकशाही अभिप्रेत होती तर दक्षिण अमेरिकेला काळ्यांची गुलामी हवी होती.या मतभेदातून अमेरिकेन यादवी युद्ध भडकले.तत्कालीन उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय. अब्राहम लिंकन यांनी गर्जना केली की, ” लोकशाही धोक्यात आहे. तीला वाचविणे आमचे कर्तव्य आहे. “असे म्हणून त्यांनी युद्धाचे रणशिंग फुकले.त्यात ते यशस्वी झाले.सहा वर्षांच्या युद्धानंतर लोकशाही जिंकली!
अशीच वेळ आता आपल्या देशात बरोबर स्वातंत्र्याच्या अवघ्या 75 वर्षात निर्मझाली आहे.आणि या सर्वांचे मूळ म्हणजे आमच्या मताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या या EVM मध्ये आहे.तेंव्हा तीला जगाच्या वेशीवर कायम टांगून मातीत गाडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे…..
कारण महाराष्ट्रातील नवीन विधानसभेतील सर्वच आमदार आणि त्यातून निर्माण झालेले हे सरकार असंविधानिक आहे.त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्रात एकाच दिवशी शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आपण महामोर्चाचे आयोजन केलेले आहे…
तेंव्हा औरंगाबादवासियांनी सोमवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे जमून मोर्चाला सुरुवात करणार आहोत. तेंव्हा हजारोच्या संख्येने सामील होऊया….
आवाहनकर्ते
जागृत नागरी कृती समिती..
संपर्क
१) अनंत भवरे संविधान विश्लेषक..
7875452689 …
२) प्रा.भारत सिरसाट सर
9421308101…
३) प्रा.मछिंद्र गोर्डे सर
9422290123…
४) जितेंद्र भवरे
9421316074 पत्रकार…