तुपकर मुरमाडी येथे भरड धान्य महोत्सवाचे आयोजन.. — निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभागाचा स्तुत्य उपक्रम…

 

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

मुरमाडी /तूप :- स्थानिक निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभागातर्फे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने भरड धान्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता एक दिवसीय भरड धान्य महोत्सवाचे आयोजन प्राचार्य डॉ. विश्वास खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

          कार्यक्रमाला ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.विशाल गजभिये, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भेदराज ढवळे,समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.स्नेहा श्यामकुवर,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. महेंद्रकुमार फुलझेले, प्रा.तृप्ती गणवीर, गितेश्वरी तरोणे व किशोरी नानोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ अर्चना निखाडे यांनी उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थीनी तसेच महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष असून आपल्या सर्वांच्या आहारात भरड धान्ये का आवश्यक आहेत याची पुरेपूर माहिती आपल्या प्रास्ताविकपर प्रमुख मार्गदर्शनातुन केले.आपल्या मार्गदर्शनात डॉ अर्चना निखाडे यांनी प्रत्येक भरडधान्यामधील पोषक घटकांची माहिती विविध उदाहरणासहित सादर केली. यानंतर विद्यार्थ्यांनींनी भरड धान्यापासून तयार करून आणलेल्या पदार्थांचे प्रदर्शन महाविद्यालयात लावण्यात आले.

  सर्वच प्रमुख अतिथी प्राध्यापकांनी भरडधान्य पदार्थांच्या प्रदर्शनीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनींच्या सुगरण कौशल्याचे कौतुक केले.

 यावेळी भरड धान्य घोषवाक्य व भरड धान्य पोषक पदार्थ बनवा व भरड धान्य रांगोळी स्पर्धाचे सुध्दा आयोजन करण्यात आले .भरडधान्य घोषवाक्ये स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी बनकर द्वितीय क्रमांक तृप्ती मारवाडे तर तृतीय क्रमांक प्रियंका लांजेवार हिला प्राप्त झाला.

        भरडधान्य रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्चना साठवणे, व्दितीय क्रमांक योगिता गायधने तर तृतीय क्रमांक पूजा कठाणे यांना प्राप्त झाला प्रोत्साहनपर क्रमांक ज्ञानेश्वरी माहूरकर हिला मिळाला भरडधान्य पदार्थ बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा शिंदे तर द्वितीय क्रमांक सोनम पंचबुद्धे तर तृतीय क्रमांक प्रियंका लांजेवार हिला प्राप्त झाला.

         कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. विशाल गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.स्नेहा श्यामकुवर यांनी केले.

   कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गृहअर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थीनी पूजा शिंदे, योगिता गायधने, ज्ञानेश्वरी माहूरकर, पूजा कठाणे, दिव्या कठाणे, तृप्ती मारवाडे, पल्लवी बनकर, सोनम पंचबुद्धे, अर्चना साठवणे, प्रियंका लांजेवार, सोनाली जवंजार,चेतना मेश्राम, मयुरी शहारे, त्रिवेणी कठाणे, अश्विनी आंबेडारे, आचल देशमुख, माहेश्वरी कठाणे ,अश्विनी लांजेवार यांनी तसेच इतर सर्वच प्राध्यापक वर्ग तसेच कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.