ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रा विषयी माहिती सांगून आपल्या भारताला संविधान अर्पण करणाऱ्या महामानवाचा सर्व विद्यार्थ्यांनी गुण अंगिकारून देशाच्या विकासासाठी व भवितव्यासाठी प्रयत्नशिल बनावे असे आव्हान केले. श्री जंयत खोब्रागडे यांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा मुलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी गीत गायन करुन उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य केले. कार्यकमाचे संचालन जंयत खोब्रागडे व आभार सरताज साखरे यांनी केले.