
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सोळाव्या शतकातील संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासत त्यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथे ८ डिसेंबरला,”संत श्री.संताजी जगनाडे महाराज,यांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी,त्यांचे मानवी मुल्यांचे जतन करणारे विचार अंगीकृत करण्यासाठी व त्यांना भावपूर्ण विनंम्र अभिवादन करण्यासाठी,”भव्य शोभायात्रेचे आयोजन तेली समाज बांधवांतर्फे करण्यात आले आहे.
संतांची वाणी व संतांची भुमी ही अमर्याद असते.जसा काळ बदलतो,तसेतसे त्यांच्या वाणीतंर्गत सत्यवचन विचारांनी परिवर्तन होत जातय व समाज विचारशील बनतो,समाज जागरूक बनतो,समाज एकसंघ होतो,समाज सुधारतो,समाज गतिमान होतो हे निख्खळ वास्तव आहे.
हेच भिसी येथील तेली समाज बांधवांच्या परिवर्तनशील विचारातून दिसून येते आहे.
समाज एकसंघ ठेवणे,समाजा बांधवांचे सर्वोत्तोपरी हित जोपासणे, समाजाला सर्वोच्च स्थान देत समाजाची उन्नती करणे,आपल्याबरोबर इतरेत्र समाज बांधवांना समानतेच्या आधारावर जवळ करणे,त्यांचेही संरक्षण करणे,त्यांचेही हित जोपासणे,मनात कुणाच्याहीप्रती हिन भावना येणार नाही असे विचार अंगीकृत करणे हिच संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची शिकवण आहे.
संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या सान्निध्यात राहून किर्तनाच्या व भजनांच्या माध्यमातून लोकहितार्थ समाज सेवा करणारे संत श्री.सताजी जगनाडे महाराज आपल्या कुशाग्र बुध्दीला जपणारे होते.
संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर संत श्री.जगनाडे महाराज यांनी समाज सेवेचे कार्य अविरत तेवत ठेवले व आपल्या वाणीतून माहांत्तम समाजप्रबोधन केले.एवढेच काय तर संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी लिहिलेली,”अंभग गाथा, इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न धर्ममार्तंडांनी केला होता,त्याला छेद देत संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्या मुखोद्रीत असलेल्या संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अंभग गाथेला पुन्हा लिहून सामाजिक न्यायाची व सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्ञान ज्योत तेवत ठेवली,प्रज्वलीत करुन ठेवली.
तात्कालिन विषमतावादी पाशवी अत्याचार वृत्तीला व अन्याय कृतीला न जुमानता समाजप्रबोधनाचे संत श्री.संताजी जगनाडे महाराज यानी केलेले पराकोटीचे महान कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
तात्कालिन विषमतावादी परिस्थितीचा विचार केल्यास संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा छळ करणाऱ्या व्यवस्थे विरोधात परत जोमाने समाज सेवेचे कार्य अविरत करणे व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अंभग गाथा परत लिहिने म्हणजे संत श्री.संताची जगनाडे महाराज हे प्रचंड बौध्दिक क्षमतावादी व आत्मविश्वासी होते हे लक्षात येते.तद्वतच संत श्री.संताजी जगनाडे महाराज हे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या चौदाव्या टाळकऱ्या पैकी एक होते.याचाच अर्थ असा की संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अगदी जवळचे संत श्री.संताजी जगनाडे महाराज होते असे स्पष्ट आहे.
संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म इ.स. ८ डिसेंबर १६२४ ला पुणे जिल्हातंर्गत मवाळ तालुक्यातील मौजा सुदुंबरे या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव माथाबाई होते तर वडिलांचे नाव विठोबा जगनाडे होते.
संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या घरची परिस्थिती चांगली होती.त्यांच्या आईवडिलांवर श्री.विठ्ठू माऊलींच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे घरी उतंम धार्मिक वातावरण होते.
तात्कालिन रुढीपरंपरे नुसार अल्पवयात लग्न व्हायचे.यामुळे संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांचे सुध्दा वयाच्या १२ व्या वर्षी येमुनाबाई सोबत लग्न झाले होते.
***
भिसी आणि संत श्री.संताजी जगनाडे महाराज…
संत श्री.संताजी जगनाडे महाराज म्हणजे उतंम विचारांचा नेहमी वाहनारा निर्मळ व पवित्र झरा होय.त्यांचे विचार सर्व समाजाला प्रेरणा देणारे व सर्व समाजाला जोडणारे आहेत.
अशा या महान संताची शोभा यात्रा भिसी या गावात अतिशय सन्मानपूर्वक आणि पवित्र वातावरणात ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला निघतो आहे.
महान संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणारी,”शोभा यात्रा काढणारे,मौजा भिसी येथील,”धन्य ते सर्व लोक व धन्य तो तेली समाज,….