निरा नरसिंहपुर दिनांक: 7
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
बावडा ते नरशिंहपुर परिसरात सालाबाद प्रमाणे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . दत्त जयंतीचे आवचित्य साधून पिंपरी बुद्रुक गावच्या वतीने आखंड हरिनाम सप्ताह चालु आसुन, पिंपरी बुद्रुक येथील सर्वच गावातील ग्रामस्थांच्या व भाविकांच्या वतीने दररोज भाविकांसाठी संपूर्ण अन्नदान सेवा चालू आहे. दत्त जयंतीची कीर्तन सेवा काजळे महाराज यांची झाली. तर दत्ताच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, नरशिंहपुर, टणु ,गिरवी ,ओझरे, गोंदी, सराटी, लिंबुडी, पिंपरी बुद्रुक, या सर्वच परिसरामध्ये दत्ताचा पाळणा महिलांनी गाऊन तसेच किर्तन व टाळ मृदंगाच्या आवाजात सर्व भाविकांच्या उपस्थिती मध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली,
सुनील बोडके, आबासाहेब बोडके , तुकाराम बोडके यांच्या वतीने दत्त जयंतीच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
उपस्थितीत असलेल्या सर्व भाविक भक्तांनी शेवटी महाप्रसाद घेऊन दत्त जयंतीची सांगता झाली.