विदर्भ मराठा मंडळाचा मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाज आरक्षणासाठी राजगुरुनगर येथील बेमुदत साखळी उपोषणाला विदर्भ मराठा समाज मंडळाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी विदर्भ मराठा समाज मंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष हभप गजानन महाराज लाहूडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सभापती अंकुश राक्षे, कैलास मुरलीधर डोंबाळे, संतोष पाटील, संदीप पाटील, सागर महाराज लाहुडकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

           राज्यातील मराठा समाजातील अनेक कुटुंबातील मुले मुली मागास असल्याने ते उच्च शिक्षण घेण्यासाठी वंचित राहत आहेत तरी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी खेड येथील बेमुदत साखळी उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांच्या मागण्या तत्काळ मान्य करून आरक्षणाची घोषणा करून कायम स्वरुपी टिकेल असे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी विदर्भ मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष हभप गजानन महाराज लाहूडकर यांनी केली आहे.