उमेश कांबळे ता प्र भद्रावती –
भद्रावती येथे कॉग्रेस पक्षाच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शहर अध्यक्ष सुरज गावंडे , प्रशांत झाडे , प्रवीन महाजन , दातारकर विनायक येसेकर, धर्मा गायकवाड , उमेश रामटेके , तनू शेख, गोलू शेख आदी उपस्थीत होते. यावेळी बाबासाहेबांना मानवंदना देताना अनिल धानोरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विषई मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कॉग्रेस पक्षाचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.