शेखर इसापुरे ,
विभागीय प्रतिनिधी, नागपूर
दखल न्यूज, भारत
नेर परसोपंत:- डॉक्टर अतुल गद्रे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांचं शिक्षण एम. व्ही. एस. सी. पर्यंत झाले होते. ते पोल्ट्री इंडस्ट्रीज मध्ये एक्सपर्ट होते. शेतकरी, शेतमजुरांचे उत्थान करण्यासाठी त्यांचा ग्रामीण भागाशी सतत संपर्क होता. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या तेरवीच्या दिवशी, त्यांची सतत आठवण राहावी म्हणून नरेंद्र गद्रे संस्थापक बळीराजा स्वराज्य सेना यांच्या संकल्पनेतून डॉक्टर अतुल गद्रे बचत गट जनकल्याण योजना ची सुरुवात 6 डिसेंबर पासून करण्यात आली. या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार नेते माननीय बाबू पाटील जैत हे होते.
याप्रसंगी बळीराजा महिला बचत गट शिरजगाव व उन्नती महिला बचत गट माणिकवाडा यांना प्रत्येकी 70 हजार रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. यासाठी नेर अर्बन नेर परसोपंत व गुरुदेव नागरिक पतसंस्था कोराडी यांचे सहकार्य लाभले.
या योजनेमध्ये बचत गटांमध्ये सात महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतील व त्यांना सशक्त करण्यासाठी बळीराजा जनकल्याण एनजीओ मार्फत मोफत प्रशिक्षण दिल्या जाईल व त्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्या जाईल.
या भावपूर्ण श्रद्धांजली च्या कार्यक्रमानिमित्त माननीय सतीश काळमेघ सहाय्यक महाप्रबंधक बीएसएनएल अमरावती , माननीय खुशालराव ठाकरे ग्रामगीताचार्य यवतमाळ, माननीय स्नेहल भाऊ भाकरे संचालक मध्यवर्ती बँक यवतमाळ, प्रदीप वादाफळे विदर्भ अध्यक्ष कुणबी परिषद, प्रशांत काळे सचिव नेर अर्बन, रहेमान शेकुवाले जिल्हाध्यक्ष संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन बीएसएनएल यवतमाळ, मा. शशांक चुंबळे महाराष्ट्र अध्यक्ष आरोग्य संघटना, मोहन वरारकर सचिव कोराडी अर्बन , माननीय जयप्रकाश दाणी अध्यक्ष खेडुले कुणबी समाज पुणे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
मा. गणेश राऊत अध्यक्षअष्टविनायक अर्बन यांनी योजनेची संपूर्ण माहिती दिली व याप्रसंगी योजनेचा शुभारंभ करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट रमेश जुनगरे साहेब व आभार डॉक्टर अभीविलास नखाते अध्यक्ष प्रबोधनकार महिला महाविद्यालय रामटेक यांनी केले.
याप्रसंगी राजेश धोटे बळीराजा निवासी संचालक बळीराजा स्वराज्य सेना , अनिल महाजन बळीराजा सहाय्यक, प्रफुल नेरकर व्यवस्थापक व शैलेंद्र मदने लिपिक तसेच बळीराजा स्वराज्य सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी खूप खूप मेहनत घेतली. यानंतर प्रबोधनकार नयन मडावी सत्यपाल महाराजांचे शिष्य यांच्या प्रबोधनकार सप्त खंजिरी ची सुरुवात झाली.