युवराज डोंगरे/खल्लार
पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत मांजरीला म्हसला येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव नुकताच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद रुमणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.कल्पना वानखडे गट शिक्षणाधिकारी नांदगाव खंडेश्वर, हेमंत ढेपे सरपंच मांजरी म्हसला, पल्लवी कांबळे, महेंद्र गारोळे, प्रमोद डोक, उपस्थित होते. तसेच क्रीडा मंचावर केंद्रांतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रशांत गुल्हाने, किरण पाटील, अनिता कापडे, रविंद्र गजभिये, अर्चना बैतूले, अनिल देशमुख, प्रियंका राणे, सुरज मंडे, मनिष अवघड, हेमलता भिमटे. उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गिरी यांनी तर प्रास्ताविक सुरज मंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत गुल्हाने यांनी मानले.
कोरोना कालावधीनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या या क्रीडा महोत्सवात मुलांचा खेळण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. केंद्रातील जिल्हा परिषद एकूण 10 शाळेतील 700 च्या आसपास मुलांनी विविध क्रीडा प्रकारात आपला सहभाग नोंदविला माध्यमिक व प्राथमिक 14 सांघिक खेळ प्रकार विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे वैयक्तिक सामन्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाकरिता केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
त्यामध्ये प्रामुख्याने जितेंद्र यावले, अशोक बेरड, संदीप झाडे, राजेंद्र काळे, मनोज भांदर्गे, प्रशांत सापाने संजय नेवारे, कमलाकर कदम, किशोर गणविर , पवन मसराम, उमेश ठाकरे, गजानन वाके, गजानन होळकर, छाया कराळे, उज्ज्वला भडांगे, प्रेरणा पेठे, रेखा सावळे, जयश्री पांडे,अनघा भोपडे ज्योती जगताप, अनिता जोशी, हर्षमाला मासोतकर, अर्चना कवाने, प्रणिता मनगुडे, राखी सरोदे, मीना नगराळे ज्योती देशमुख, सारिका पाटील, शेख भाऊ , कायटे, आदींनी अथक परिश्रम घेतले.