छन्ना खोब्रागडे प्रतिनीधी
श्री. साईनाथ विद्यालय त्याचा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य जीभकाटे सर व प्रमुख पाहुणे लोथे सर ,लांडगे साहेब, वैद्य सर इत्यादी हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमरकर सर यांनी केले. आपल्या भाषणातून त्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या संघर्षमय जीवनाचा वृत्तांत सविस्तरपणे वर्णन केला. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झालेत. शेवटी अध्यक्ष भाषणातून जीभकाटे सरांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून त्यांचा अनुकरण करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता साळवे सर, आकरे मॅडम, वाघे सर, अवचट सर निंबेकार सर ,निकुरे सर यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे संचालन छन्नाना खोब्राकडे सर यांनी केले तर आभार साळवे सर यांनी मानले.