ऋषी सहारे

संपादक

 

संविधान दिनानिमित्य २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा निमित्य “एकजूट व्हा! महिला व मुलीवरील होणारे अत्याचार संपवा या विषयावर हा पंधरवाडा संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. त्यामित्य व ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्य दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोज रविवारला आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या ज्ञानज्योती स्पर्धाग्राम सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मा. मेंढे साहेब, दिवाणी न्यायाधीस कनिष्ट स्तर तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगुलवार, संयोजक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा तसेच तालुका अपंग संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद बन्सोड व संगती शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका श्रीमती शालिनी अंबादे उपस्थित होत्या.

 

मा. मेंढे साहेब यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे महत्व सांगून जनतेला असलेले अधिकार यासोबतच व्यक्तीचे कर्तव्य यावर भर दिले. संविधान निर्मितीतून भारताने पारंपारिक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमतेकडून स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय है तत्व स्वीकारून समान संधीतून सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला. परंतु त्यावर अनेक कारणामुळे पूर्णपणे अंमलबजावणी होवू शकली नाही. त्यामुळे वंचित समूह, महिला, दिव्यांग व्यक्ती हे अजूनही विकासाच्या प्रक्रियेत मागेच आहेत. त्यावर काम करण्याची आज अत्यंत निकडीची गरज आहे. हे करताना charity च्या नाही तर empathy च्या

दृष्टीकोनातून विचार आणि प्रयत्न केले पाहिजे हे बोलत असतानाच संसाधानाचे समान

वितरण, नैसर्गिक संसाधानांवरील मालकी आणि आरक्षणातून मिळणाऱ्या संधी यावर भाष्य

करीत असतानाच कायद्याची असलेली चौकट आणि मर्यादा याकडेही उपस्थितांचे लक्ष

वेधले आज सर्वांना सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे स्वावलंबी आनंदी जीवन जगायला

मिळणे हे त्यांचे हक्क आहे त्याकडे आपण काम केले पाहिजे.

 

डॉ. सतीश गोगुलवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचा आधार घेत संस्था गडचिरोली जिल्हयात करीत असलेल्या कामातील दृष्टिकोन कसा समुदायांना स्वयंसहाय्यता आणि स्वशासनातून स्वतःचा विकास करण्यात प्रोत्साहित करतो याबाबत सांगितले. दिव्यांगांच्या बाबतीत बोलताना दिव्यांगांसोबत काम करताना त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना संधी देण्याची गरज व्यक्त केली. संस्था संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांना संघटीत करून त्यांना कायदे आणि योजना यावर मार्गदर्शन करीत आहे. तसेच कौशल विकास आणि उद्यमशीलता विकास सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करीत आहे. श्री. प्रल्हाद बन्सोड यांनी तालुका अपंग संघटना कुरखेडा च्या कामाची माहिती दिली तर संगती शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका श्रीमती शालिनी अंबादे यांनी दिव्यांगांनी एकत्र येत का व कशा पद्धतीने कंपनीची स्थापना केली आणि पुढे त्यांचा आर्थिक विकासाचा मानस व्यक्त केला.

 

 कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची प्रस्तावना वाचन करून करण्यात आली. त्यानंतर श्री. मुकेश शेंडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यांनी सांगितले कि, सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर महिलावरील अत्याचार बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. अशा स्थितीत समाजाला जागृत आणि संवेदनशील बनविण्याची गरज असून या पंधरवाडयांच्या अनुषंगाने आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था हि प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन श्री. यशवंत पाटणकर, सचिव, विदर्भ विकलांग संघटना यांनी केले तर श्रीमती भरती नंदेश्वर

 यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती. संगिता तुमडे, सुष्मिता हेपट तसेच संघटनेचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com