चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली :- कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील राष्ट्रीय हरित सेना योजना व माझी वसुंधरा 5.0 पर्यावरण सेवा योजना अंतर्गत असलेल्या ‘जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब’ तर्फे वन्यजीव सप्ताहांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सोबतच विद्यार्थ्यानी ‘टाकाऊ पासून टिकावू ‘ या संकल्पनेअंतर्गत अनेक टिकाऊ वस्तू स्वहस्ते तयार करून आणल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक व्ही.एम. देवगिरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पुष्पा बोरकर,अंजना रणदिवे,नीलिमा गेडाम हे होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ‘जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब’चे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी विद्यार्थ्याना कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यावर विस्तृत मार्गदर्शन करून ‘पाच आर’ ही सूत्रसंकल्पना सर्व विद्यार्थ्याना समजावून दिली.
सोबतच त्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ वस्तूचे प्रदर्शन विद्यार्थ्याना दाखविले.त्याचबरोबर वन्यजीव सप्ताहानिमित्त साकोलीजैवविविधता उद्यान आणि साकोली नवतलाव परिसरात सलग दोन दिवस पक्षिनिरिक्षण व निसर्गफेरीचें आयोजन करून अनेक पक्षी, फुलपाखरे, कीटक ,साप ,चतुर , वनस्पती यांची ओळख विद्यार्थ्याना करून दिली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रा. गायधने सरांच्या प्रदर्शनातून प्रेरणा घेत स्वहस्ते ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ अनेक वस्तू तयार केल्या.
या स्पर्धेत गुंजन घरत,रिया बडोले यांना प्रथम क्रमांक तर मनस्वी राऊत व समीक्षा कापगते यांना व्दितीय तर चाहत अरकासे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक जान्हवी धकाते,श्रेया सलामे यांना प्राप्त झाला.
वन्यजीव सप्ताह निमीत्ताने निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन वनविभाग साकोली तर्फे आयोजन करण्यात आले.यात ‘वन्यजीवांचे संरक्षण’ या विषयावरील निबंध स्पर्धेत विद्यालयातून प्रथम क्रमांक चाहत अरकासे व रिया बडोले यांना तर द्वितीय क्रमांक गुंजन घरत हिला तर तृतीय क्रमांक देवांश मानकर याला प्राप्त झाला.
‘प्रेमाचे प्रतिक सारस पक्ष्याची जोडी’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत ईशिका कांबळे, चाहत अरकासे यांना प्रथम क्रमांक तर गुंजन घरत यांना व्दितीय क्रमांक प्राप्त झाला.वरील तिन्ही स्पर्धेचे परीक्षण पुष्पा बोरकर, अंजना रणदिवे, निलिमा गेडाम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा बोरकर, अंजना रणदिवे, निलिमा गेडाम,शीतल साहू,शिवपाल चन्ने, दिनेश उईके, शिवदास लांजेवार,अविनाश मेश्राम,संजय भेंडारकर, जागेश्वर तिडके, बाळकृष्ण लंजे तसेच इतर सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.