आदिवासी कोळी महादेव समाजाच्या आमरण उपोषणाला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पाठींबा.. — सुधिर सुर्यवंशी संपर्क प्रमुख यांची उपोषणस्थळी भेट…

युवराज डोंगरे/खल्लार 

     उपसंपादक

 बेरार प्रांतातील (अमरावती महसुल विभाग) आदिवासी कोळी महादेव जमातील सुलभरीत्या / विना अट जात प्रमाणपञ व जात वैधता प्रमाणपञ देण्यात यावे. या मागणी करीता दर्यापुर तहसील कार्यालय येथे विशाल नानासाहेब बगाळे दि. १ नोव्हेबर पासुन उपोषणाला बसले आहेत.

          त्यांची मागणी मान्य होवुन आदिवासी कोळी महादेव समाजाला न्याय मिळावा यासाठी शिवसेना पक्षाचा पाठींबा देण्याकरीता सुधिर भाऊ सुर्यवंशी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्ता यांची तब्बेतची विचारपुस केली. तसेच उपस्थित महादेव कोळी समाजाला संबोधित करतांनी आपली मागणी रास्त असुन सन १९९५ पर्यत आपल्याकडे जात प्रमाणपञ व जात वैधता दाखला मिळत असतांनी आता का दिला जात नाही. म्हणजे तुमची राजकीय आरक्षण नष्ट करायचे आहे व शैक्षणिक दृष्टा मागासले ठेवायचे आहे. त्याकरीता कोणत्याची लढाई करण्यास आम्ही तुमच्यासोबत आहेत.असे मत सुधिर भाऊ सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

            यावेळी त्यांच्यासोबत युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, शिवसेना तालुका प्रमुख सुनील डिके, मा.शिवसेना भातकुली तालुकाप्रमुख वसंत इंगळे, निलेश पारडे, बबन विल्हेकर, दिलीप राहाटे, प्रमोद टेवरे, सतीश घाटे, मनोज लोखंडे, योगेश मोपारी, भरत गावंडे, योगेश बुंदे, बाळासाहेब बगाडे, पंकज राणे उपस्थित होते.