वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्रांतर्गत मानोरा तालुक्यातील पारवा गावामध्ये दि.०७/११/२०२२ रोजी स्थानिक नेतृत्व प्रशिक्षणातील युवकांनी गावामध्ये पुढाकार घेऊन उद्बोधन कार्यक्रमचं आयोजन करण्यात आले होते.
या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.त्यामध्ये अनुभव शिक्षकेंद्राचे धर्मनिरिक्षता, सामाजिक न्याय,स्त्री पुरुष समानता,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण,या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमाबाबत आणि अनुभव कट्ट्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आल तसेच गावामध्ये अनुभव कट्टा सुरू करण्यात आला.
यामध्ये पारवा गावातील युवकांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.या बैठकीला मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे उपस्थित होते.
उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव साथी विनोद राठोड,सतीश भगत,ऋषी चौधरी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि युवकांचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता.अशाप्रकारे हा उद्बोधन कार्यक्रम संपन्न झाला.
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत