सतिश कडार्ला,

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली,(जिमाका)दि.07: महाराष्ट्र राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातुर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा,अमरावतो, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयामध्ये गायवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

गडचिरोली जिल्हयातील मोजा- शिवणी ता- गडचिरोली येथील पशुधनामध्ये पहिल्यांदा लम्पी स्किन डिसिज ( Lumpy Skin Desease) सदुष्य लागण झाल्याचे रोग लक्षणावरून निर्देशनास आले आहे. सदर बाधित जनावरांचे रोग नमुने गोळा करण्यात आलेले असून रोगाची खात्री करण्याकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.

मोजा- शिवणी हे गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले असून त्याच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर विजेचा परिसर सर्तकता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सतर्कता क्षेत्रात मोजा- कनेरी,कुलखल, मुझ्झा,(बु), मुडझा,(तु),वाकडी, डोंगरगाव (बु), डोंगरगाव (तु), हिरापुर चक व कृपाळा हि गावे सामाविष्ठ आहे.

   सदर गावामध्ये एकूण लसीकरण – 4310 इतके झालेले आहेत. तरी सदर क्षेत्रातील गावामध्ये लसीकरणातून काही जनावरे सुटलेले असतील तर त्यांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडुन तात्काळ लसीकरण करून घेण्यात यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. गडचिरोली जिल्हयात एकूण 4,30,000 लसमात्रा प्राप्त झाली असून आज तागायत 4,04,446 इतके लसीकरण करण्यात आलेले आहे.

   लम्पी चर्मरोग बाधित पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुंना ताप येणे, पुर्ण शरीरावर 10-15 मो.मी. व्यासाच्या कडक गाठी येणे,तोंड नाक व डोळयात व्रण निर्माण होणे,चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा,भुक कमी होणे,वजन कमी होणे, दुध उत्पादन कमी होणे, डोळयातील व्रणामुळे दृष्टी बाधीत होणे, काही वेळा फुफुसदाह किंवा स्त्नदाह होणे, पायावर सुज येऊन लंगडणे, गाभण जनावरामध्ये गर्भपात होणे अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आठवडयात बरी होतात.त्यामुळे वेळीच उपचार करुन घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले.

   या रोगाची जिल्हयामध्ये इतर तालुक्यात लक्षणे पशुमध्ये आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती/अशासकीय संस्था/संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी प्राण्यामंधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 4(1) अन्वये लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यामधील संक्रामक रव सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम, 2009 मधील कलम 32 येथील नमुद तरतुदीनुसार संबधीत खाजगी पशुवैद्यक, पशु व्यापारी, वाहतुकदार विरुध्द गुन्हा नोंद केला जावू शकतो यांची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली, डॉ.विलास गाडगे यांनी कळविले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com