युवराज डोंगरे/खल्लार
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी खल्लार ते शेगाव पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन दि 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले असुन यंदा या पालखी सोहळ्याचे 11 वे वर्ष आहे.
या पालखीचे प्रस्थान दि 9 नोव्हेंबरला खल्लार येथून गजानन महाराज मंदिरांतून होणार असून विविध गावातून हि पायदळ पालखी जाणार आहे. या पायदळ पालखी सोहळ्याचे दिंडी नेतृत्व गजानन महाराज कोल्हे हे करणार असून मार्गदर्शक म्हणून सौ रजनीताई दिलीप बेलसरे या मार्गदर्शन करणार आहेत. तर पालखीत मृदुनगाचार्य देवानंद पुंडेकर,विणेकरी सुभाष पवार, चोपदार संजय कडू, हे राहतील तर ग्रंथाचे पारायण प्रशांत खराडे करणार असल्याची माहिती दिंडी प्रमुख संदीप अवधुतराव सावरकर यांनी दिली आहे.