प्रदीप रामटेके

     संपादकीय

          प्रा.सुषमा अंधारे म्हणजे या देशातील चिरपरिचित सक्षम असे वैचारिक व्यक्तीमत्व!..”विपरीत परिस्थितीत स्वतःला घडवून, देशातील तमाम समाजातील नागरिकांना घडविण्यासाठी मनःपुर्वक तळमळीने तथा हृदयस्पर्शी पोटतिडकीने संघर्ष करणाऱ्या त्या भारत देशातील प्रभावशाली व तेजस्वी वैचारिक प्रज्वलित दिप आहेत हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही..

          प्रा.सुषमाताई अंधारे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९७४ साली झालाय.गरीब घराण्यात जन्माला आलेल्या प्रा.सुषमाताई अंधारे यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले व त्यांनी एम.ए.,बिए.ड.,पिएचडी,लाॅ, पर्यंतचे शिक्षण घेतले.

       याच बरोबर देशातील धार्मिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,आर्थिक,कायदेशीर,व इतर क्षेत्रातील व्यवस्थेचा त्यांनी गाढा अभ्यास केलाय.त्या वैचारिक दृष्टिकोनातून आजच्या घडीला परिपक्व अशा मजबूत वैचारिक ग्रंथ आहेत.

       Ad.सुषमाताई अंधारे यांनी न्यायसंगत मार्गावर आरुढ होत चारित्र्याला कटाक्षाने जपले आणि तथागत भगवान गौतम बुध्दाच्या धम्माला जवळ करीत कार्यक्षम झाल्यात.तद्वतच भारत देशातील अनेक राज्यांत जनहितार्थ विचार पेरलेत.

        प्रा.सुषमाताई अंधारे यांनी देशातील तमाम समाजातील नागरिकांना योग्य दिशा देण्याचे केलेले कार्य व करीत असलेले कार्य,”अनिष्ट परंपरावादी व्यवस्थे अंतर्गत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तनीय ठरु लागलेले आहे,हेच त्यांच्या धैर्य पुर्ण संघर्षाचे सुयोग्य असे यश आहे,हे नाकारता येत नाही. 

            प्रा.सुषमाताई अंधारे यांनी अख्या भारतात त्यांची ओळख स्वकर्तृत्वावर केलेली आहे हे वास्तव नाकारणारे,”लोक, एकतर अहंकारी आहेत नाहीतर स्वतःला मनस्वी कमजोर समजतात?असेच दिसते आहे .

        प्रा.सुषमाताई अंधारे ह्या स्वाभिमान गहाण ठेवून बेकायदेशीर कार्य करणाऱ्या,”ऐऱ्यागैऱ्या नथ्थू खैऱ्या व्यक्तीमत्व,नसल्यामुळे अनेकांना त्यांची धडकी भरलेली आहे हेच महाराष्ट्र राज्यातील राजकीय सारीपाटावरुन स्पष्ट लक्षात येते आहे. 

     आज त्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपनेत्या आहेत.अतिशय बिकट परिस्थितीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मजबूत आणि भक्कम करण्यासाठी ज्या पध्दतीने त्या वैचारिक मांडणी करतात,”ती वैचारिक मांडणी,अभ्यासली तर असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्यातील नागरिक जागरूक व सतर्क होत आहेत.

        म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील नागरिक जागरूक व सतर्क होवू नये यासाठी प्रा.सुषमाताई अंधारे यांच्यावर अशलाध्य व बिनबुडाचे आरोप करणे सुरू झाले आहे आणि त्यांच्या सभेला परवानगी नाकारणे सुरू केले आहे. 

       अर्थात महाराष्ट्र राज्यातंर्गत प्रा.सुषमाताई अंधारेंच्या राजकीय एंट्रीने अपरिपक्व विचाराचे व षड्यंत्रकारी राजकीय पुढारी आंत्तरीक मनानी व विचारांनी अक्षरशः घाबरले आहेत व हादरले आहेत,असे समजायला हरकत नाही.

      आदरणीय प्रा.सुषमाताई अंधारे,”तुमचा उद्याला वाढदिवस आहे,….”तुमच्या वाढदिवसानिमित्ताने,…”तुम्हाला,…..”दखल न्यूज परिवारातर्फे,…..”उज्वल भविष्यासाठी व कणखर नेतृत्वासाठी,उत्तम दिशादर्शक कार्यासाठी,…”मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!…

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com