ऋषी सहारे
संपादक
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे गावाच्या बाहेरून जाणारी बस गावातील सर्व शाळकरी मुलांना, वयोवृद्ध व्यक्ति व अन्य नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मुख्य बसस्टॉप वर महामंडळचीं बस आणावी अशी मागणी आरमोरी तालुकासचिव सुरेंद्र वासनिक यांनी निवेदनातून करत हप्ता भरात जर बस गावातील बसस्टॉप वर आली नाही, तर वैरागडच्या सीमेवर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आझाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते.
अब बात होगी क्रांती से…!