उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच इतर वार्डात रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून नागरिकाना ये जा करीत असताना त्रास होत आहे आणि त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे या संदर्भात नगर परिषदेने तात्काळ उपाय योजना करावी अन्यथा जनहीतार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव रुपेश मांढरे यानी निवेदनातून केला आहे.
शहरातील झिंगुजी महाराज मठा पासून ते नगर परिषद पर्यंत मुख्य रस्त्यावर खड्डे असून चालकाचे वाहनावर नियंत्रण होत नसून अपघात सुधा झालेले आहेत. तसेच विविध वार्डात रस्ता कमी आणि खड्डे जास्त असून रस्त्याची दुर्दशा अत्यंत दयनीय झाली आहे. सरकारी दवाखाना, पोलीस स्टेशन ते जुना बस स्टँड रोड, जामा मस्जिद ते बंगाली कम्प रोड असे अनेक रस्ते खड्डेमय असून नगर परिषद ने जातीने लक्ष देवून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.
तसेच नगर परिषद तर्फे टैक्सच्या स्वरूपात आर्थिक वसूली करून मुद्दती नंतर एक दिवस लोटला तरी रकमेवर व्याज लावून टैक्स ची वसूली करतात. व्याजाचा भुर्दंड परिसरातील जनतेकडून केल्या जात असेल् तर योग्य सुविधा पुरविने हे नगर पालिकेचे कर्तव्य आहे. या सर्व समस्यावर् नगर पालिकेने जातीने लक्ष देवून शहरातील नागरिकाना नागरि सोई सुविधा पुराविने गरजेचे आहे.
या सर्व समस्याचा डोंगर उचलून भाजपा युवा मोर्चा तर्फे मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव रुपेश मांढरे, पवन नागपुरे, भाजपा मछीमार् आघाडी जिलाध्यक्ष संतोष नांगपुरे उपस्थित होते.