26 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 2024,”आणि,26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2025…
— संविधान दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला..75 वर्षे पूर्ण होत आहेत….
— त्या निमित्ताने संविधान जागृतीचे महान कार्य हाती घेऊया….
“संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य,अधिकार आणि त्याचबरोबर कर्तव्य सुद्धा सांगितलेत (मी तर कर्तव्यातून सिद्ध होणार त्याची तयारी चालू आहे ) ..
आजपर्यंत आपण (भारतीय जनता ) महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीला डोक्यात,हृदयात न घेता डोक्यावर आणि छातीवर घेऊन नाचत आलोय..
आता हे बंद करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.कारण 75 वर्षे नाचून,नाचून पायाचे तुकडे पडले,डोक्यावरील ओझ्याने डोक्याला केस नाही राहिले..
गळ्यापर्यंत पाण्यात बुडत आलोय.पण तरीसुद्धा नाक उघडे आहे म्हणून असुरी आनंदात आम्ही आहोत.
परंतू,आम्ही आमच्या सदसदविवेक शक्तीला (कदाचित अर्थात ती असेल तर ) कधीतरी प्रश्न विचारलाय का?
1) गेल्या 75 वर्षांपूर्वी माझ्या देशातील माझे पूर्वज जगाच्या तुलनेत कसे व का होते?
2) 75 वर्षांपूर्वी देशातील सर्वच महापुरुषांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या जडणघडणीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. की जेणेकरून येणारी त्यांची पिढी सुखासमाधानाने जगावी.त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन भारत देशाचे पुनरूजीवन केले.त्यांच्या त्याग आणि समर्पनाला आम्ही मात्र 75 वर्षात कसे काय विसरू शकतो?
3) 75 वर्षांपूर्वी आम्ही जगासोबत नव्हतो ( इंग्रजांच्या पारतंत्र्यामुळे ).आता जगासोबत आहोत.म्हणून मागचा काळ विसरून आता जगासोबत जे होईल ते सर्वांचे होईल ( या वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीमुळे ) या उद्देशाने जर आम्ही जगत असू. ते जीवन जर रशिया – युक्रेन,उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया, अमेरिका -चीन, भारत – चीन /पाकिस्तान, इराण – इस्राएल यांच्या आन्विक खुमखूमीतून जर संपत असेल,तर आम्ही बुद्धिजीवी वर्ग हातावर हात देऊन बसणार का…?
अर्थात नाहीच…..
कारण आमच्या पूर्वजांच्या कर्जाचे ओझे सोबत घेऊन मरणार नाही. भलेही बँकेचे कर्ज बुडवून मरू( विजय मल्ल्या,निरव मोदी,ललित मोदी इ. प्रमाणे) ,परंतू पूर्वजांच्या उपकाराचे कर्ज फुल नाही, फुलाची पाकळी एवढे तरी कर्ज फेडून मरू…
देशासाठी,समाजासाठी,कोणत्याही धर्माच्या आंधळ्या श्रद्धेतून लोकशाहीला घातक असलेल्या राजकारणातील विभूतीपुजेला शरण न जाता…
संविधान जागर क्रांती करण्यासाठी मी ( अनंत भवरे ) तयार आहे…..
आपणही आपल्या बौद्धिक व शारीरिक क्षमतेनुसार समर्पित व्हावे ( अर्थात त्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच ) हीच अपेक्षा…..
परंतू,संविधानाची जागर क्रांती ही परिणामकारक असावी.केवळ मनोरंजन,शायनिंग यातून जाणारी नसावी.त्यातून देशाचा नागरिक विचार करुन कांहीतरी कर्तव्यातून, त्यागातून सिद्ध होणारा तयार झाला पाहिजे.आजपर्यंत 75 वर्षात ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केले ते सम्यक परिणामकारक नव्हते.आता ती परंपरा मोडित काढून एका नव्या जोमाने,नव्या पद्धतीने, विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी धर्माच्या दिशेने म्हणजेच निसर्गवादाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया….
जोपर्यंत आपल्यात श्वास आहे तोपर्यंत…
येणाऱ्या भावी पिढीसाठी, आपण त्यागातून मातीत गाडून घेऊया…
आचरणातून निर्धाराने आवाहन करणारा..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…