श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथे स्वच्छता पंधरवडा संपन्न….

ऋषी सहारे

संपादक

                कोरवी येथील स्थानिक श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता पंधरवाडा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले. ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमार्गत विद्यार्थ्याची पोस्टर चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आली, ही स्पर्धा घेण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्याम सोनुले यांच्या नेतृत्वात पंचायत समितीत कर्मचारी मोहन ईरले, ललीत तारामच्या सहकार्याने पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी रमेश फाये यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.

             दि. 31/09/2023 ते 2 ऑक्टो २०२३ या दिवस चाललेल्या महात्मा गांधी व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात विद्यालय व विद्यालयातील परिसर विद्यार्थ्याकडून स्वच्छता करण्यांत आली. त्यानंतर गावातील मुख्य रस्ते व बाजारपेठेतील रस्ते विदयार्थ्यानी झाडून स्वच्छ केले. त्यानंतर दिनांक 2 आक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य श्याम सोनुले यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे श्रेष्ठ शिक्षक भुसारी, शारीरीक शिक्षक हटवार, प्रा. राज ठाकरे, सत्यवान मेश्राम, सुषमा खोब्रागडे मंचावर विराजमान होत्या.

          सर्व प्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

          तदनंतर विद्यालयातील विद्यार्थ्यानी थोर नेत्यांचे जीवन चरित्र कथन केले त्यानंतर काही शिक्षकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीच्या जीवनावर माहीती सांगीतली.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सोनुले म्हणाले की, स्वछतेला जीवनात फार महत्व आहे. स्वतः स्वच्छ राहील्यामुळे त्याचे आरोग्य चागले राहावे. ही आरोग्यासाठी स्वच्छता आपल्या कृतीतून म. गांधी व संत गाडगेबाबा यांच्याकडून आपल्याल प्रेरणा मिळाली म्हणून स्वच्छतेचे अग्रदूत महात्मा गांधी, संत गडगेबाबा यानांच ही उपाधी शोभते, तसेच गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या बाबत बोलताना ते म्हणाले की गांधी सत्य व अहिंसेचे तत्वाने भारताला इंग्रजांच्या हातून स्वातंत्र्य मिळवून दिले. तर भारताचे द्वितीय प्रधानमंत्री स्व लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या अल्पकाळात देशासाठी खूप काही केले, त्यांनी या देशातील बहुसंख्य लोक हे शेतकरी आहेत म्हणून त्यागी शेत विकासाला भर देवून ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला व देशाला प्रगतीपथावर पोहचविणे अशा प्रकारचे विवेचन त्यांनी या प्रसंगी केले.

        या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख बावीस्कर यांनी केले उपस्थितांचे आभार भुसारी यांनी मानले, शेवटी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.