बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
मळोली (ता. माळशिरस) येथील जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचे आकरावे वंशज व देहु संस्थानचे माजी अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांना आळंदी देवाची या ठिकाणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे भागवत वारकरी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय भागवत संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी भागवत संप्रदायामध्ये सामाजिक व धार्मिक कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देहूकर फडाचे प्रमुख व देहू संस्थान येथे आपल्या कार्याचा ठसा
उमटविणारे गुरुवर्य बापूसाहेब देहूकर महाराज यांचा मानपत्र देऊन शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे ,पंढरपूर विठ्ठल समिती सदस्य जळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. बापूसाहेब महाराज देहूकर हे अनेक वर्षांपासून मळोली या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
देशाुचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्यांनी देहूकर फडाचे नाव महाराष्ट्र राज्यामध्ये नाव लौकिक करून मोठी ओळख निर्माण केलेली आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या चारशेव्या जन्म शताब्दी निमित्त देशाच्या तत्काीलीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना आमंत्रित करून देहू संस्थांचे कार्य विस्तारित करण्याचा मोठा प्रयत्न केला.
गोर गरिब जनते पासून सर्वसामान्य वारकरी संप्रदाय ते कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर व मंत्री महोदय सर्व तोपर्यंत गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज म्हणून सर्व भागांमध्ये ओळख निर्माण केलेली आहे.