केंद्र सरकारचा,”राज्यांना शक्तीचा कंत्राटी नोकर भरती आदेश,बेरोजगारांच्या मानगुटीवर वार करणारा… — देशातील बहुसंख्य बहुजन समाजासाठी भाजपाचे भांडवलशाही धोरण मारकच… — आणि इतर..

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

            खरे सांगायचे झाल्यास भाजप पक्ष म्हणजे भांडवलशाही कार्यपद्धत आणि उच्चवर्णीयांचे रक्षण करणारा सक्रिय कार्यवाहक.भाजपाच्या अनेक ध्येयधोरणातंर्गत व त्यांच्या अनेक भुमिका अंतर्गत असे दिसून येते की भाजपा पक्षातील सुत्रधार नेहमी सरड्या सारखे रंग बदलवत असून देशातील नागरिकांना व मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करणारे नंबर एकचे चतुर देश चालक आहेत …

        अर्थात देशातील बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांनाच्या आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक,राजकीय,प्रशासकीय प्रगतीला नाकारणारे मानवतंत्र आहेत असे वाटू लागले आहे. 

         याचबरोबर भाजपा पक्षांचे सुत्रधार न बोलता स्पष्ट सांगत आहेत की देशातील बहुसंख्य समाज घटकातील नागरिकांच्या हितासाठी आवश्यक आणि महत्वपूर्ण कर्तव्य पार पाडणार नाही आणि तसे कामेही करणार नाही.तर केवळ बहुसंख्य नागरिकांच्या हिताच्या बेलगाम बोंबा ठोकणार,आणि बोंबा अंतर्गत खूप प्रशिध्दी करणार…

             अनेक ज्वलंत उदाहरणापैकी एक म्हणजे केंद्र सरकारने देशात नोकर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पध्दतीने करण्याचे धोरण अमलात आणले व सदर धोरणाची अंमलबजावणी शक्तीने आणि काटेकोरपणे राबविण्यात यावी याकरिता सर्व राज्यांना आदेश दिले आहेत.

             कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया अंतर्गत भांडवलदारांच्या हितांच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देशातंर्गत सर्व राज्यांना देऊन, त्यांच्या हिताचीच मानसिकता भाजपाच्या केंद्र सरकारने उजागर केली आहे.

           भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की भारत देशात भांडवलशाही कार्यपद्धत लागू करण्यात आली तर ती लोकशाहीला मारक ठरेल व भांडवलशाही कार्यप्रणाली लोकशाहीचे सर्वोत्तम लोककल्याणकारी असे महान मंदिर उध्वस्त करेल.

             भांडवलशाही कार्यपद्धत ही विषमता कायम ठेवण्याची एक जहाल व विषारी विचारधारा असून या विचारधारेमुळेच उच्चनीचतेला आपल्या देशात सुरुवात झाली होती व याच विचारधारेला अनुसरून वर्णव्यवस्थेची पाळेमुळे देशात खोल रुजविल्या गेली होती.

            तद्वतच धर्मग्रंथाच्या नावावर एकमेकांप्रती उच्चनीचतेची भावना रुजविण्यासाठी व ती भावना जोपासण्यासाठी देशात हजारो जाती निर्माण करण्यात आल्या होत्या व या जातीतंर्गत परत पोटजाती निर्माण करण्यात आल्या होत्या.आणि तात्कालीन शुद्र व अती शुद्र समाजाचे म्हणजे आताच्या मुळ निवासी बहुजन समाजाचे शिक्षण कायमचे बंद करण्यात आले होते‌.

          जेन्हे करुन या देशातील मुळ निवासी बहुजन समाज एक होवू नये,त्यांनी एकमेकांना समजून घेवू नये,त्यांनी एकमेकांचा तुच्छ भावनेतून तिरस्कार करावा,त्यांनी एकमेकांप्रती द्वेष करावा,त्यांनी शोषणाविरुद्ध व अन्याय-अत्याचारा विरोधात एकमेकांना साथ देवू नये,हा उदेश त्यामागचा होता असे प्रकर्षाने जाणवते आहे.

         आजच्या स्थितीत धृविकरणाच्या संबंधाने भाजपा पक्षाची असणारी वाटचाल देशातील भांडवलदारांचे व उच्चवर्णीयांचे रक्षण करणारी दिसत असून देशातील बहुसंख्य बहुजन समाजासाठी मारक ठरणारी व त्यांचे शोषण करणारी असल्याचे ठळकपणे जाणवू लागले आहे.

***

केंद्र सरकारचे निर्णय..

             १) तिन काळे कृषी कानून असोत की नागरिकत्व शिध्द करणारा नवीन नागरिकत्व कायदा असो,२) नोटबंदी असो की महिला आरक्षण अधिनियम बिल असो,३) खाजगीकरण निती असो की कंत्राटी नोकर भरती निर्णय असो,४) देशातील सर्व शैक्षणिक संस्थानामध्ये बहुसंख्य बहुजन समाजातील होतकरूं शैक्षणिक तज्ञांना व उच्च शिक्षित पात्र अभ्यासूंना न घेणारी कार्यप्रणाली असो,५) त्यांची खोट बोलणारी व भडकवणारी वैचारिक मानसिकता असो,सदर सर्व प्रकारची त्यांची कार्यपद्धत बहुसंख्य बहुजन समाजासाठी मारक ठरणारी आहे व त्यांचे धृविकरण करणारी आहे.बहुजन समाजाचे लचके करणारी आहे,त्यांचे अतोनात नुकसान करणारी आहे.त्यांना सर्व दृष्टीने कमजोर करणारी आहे.

***

आश्वासने…

                याचबरोबर,१) शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याचे दिलेली मायाजाळ आश्वासन असो की सुशिक्षित बेरोजगारांना दर वर्षी २ करोड नोकरी देण्याचे फोलपट प्रलोभन असो,२) देशातील महागाई कमी करण्याचे भुरळ आश्वासन असो की देशाबाहेर असलेला काळा रुपया आणण्याचे सोयीचे राजकारण असो,३) प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणारी जुमलेबाजी असो की रुपयांची घरसण रोखण्याचे थोतांड आश्वासन असो,४) देशातील गोरगरीबांचे जिवनमान सुधारवणारे बेजबाबदार वक्तव्य असोत की देशात समतेला व समानतेला अनुसरून बंधूभावातंर्गत सौदार्यपुर्वक वातावरण निर्माण करणारे पोकळ आश्वासन असो,..या नुसार दिलेल्या आश्वासना पैकीं भाजपाने आजपर्यंत एकाही आश्वासनावर अजिबात विचार केला नाही.आजच्या घडीला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करणारे सर्व मुद्दे भाजपाने बाजूला सारले.यामुळे भाजपा देशातील नागरिकांसोबत धोकेबाजी करणारे राजकारण करते असे म्हणायला हरकत नाही.

***

सर्वोच्च न्यायालयातंर्गत रिट पिटीशन अंतर्गत सुनावनी प्रक्रिया…

         बघांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हिएन भाटी यांच्या खंडपीठासमोर कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती प्रक्रिया व त्या अंतर्गत आरक्षण वाटा यावर सुनावणी सुरु आहे. 

             या सुनावणीला अनुसरून एक वास्तव सामोर आले.ते असे की,कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया देशात कटाक्षाने करणे हे केंद्र सरकारची असंविधानीक देण आहे.केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत की सरकारी खात्यातील पद भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने कोणताही कसूर न करता करावे.

         आणि देशातील राज्य सरकारे यांनी जाहीर केल्यापासून आरक्षणा अंतर्गत कर्मचाऱ्यांची पद भरती प्रक्रिया ४५ दिवसाच्या आत किंवा त्याहून अधिक काळात करायच्या आहे‌त.अधिक काळ म्हणजे नेमका किती काळ याची स्पष्ट माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाला दिली नाही.

            सरकार खात्यातील पद भरती संबंधाने अधिक काळाची मर्यादा न ठरविने हा एक पद भरती प्रक्रियेचा मोठा अडथळा असू शकतो.

***

     एकंदरीत सरकारी खात्यातील कंत्राटी पद भरती प्रक्रिया देशातील सुशिक्षित बेरोजगारांचे संविधानीक अधिकार नाकारणारी व त्यांचे शोषण करणारी ठरु शकते‌.

         याचबरोबर विषमतावादी विचारधारेला व कर्तव्याला बळ देणारी ठरु शकते.

            यामुळे देशात अराजकता माजणार नाही याची काळजी संविधानीक मार्गाने जनतेंनी स्वतः घेणे आत्ता अत्यावश्यक झाले आहे आणि भाजपचे केंद्र सरकार व राज्य सरकारे लोकशाही मार्गाने नाकारने भारतातील नागरिकांसाठी अनिवार्य आहे,असा जनतेचा आवाज सर्व देशाच्या काणाकोपऱ्यातून पुढे येण्याची शक्यता आहे.