सावली (सुधाकर दुधे)
बॉटनी क्लब ,राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर व वनविभाग सावलीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर अशोक खोब्रागडे सर ,प्रमुख वक्ते इको.प्रो. संनघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे सर ,श्री व्ही. ए राजूरकर,वनपरीक्षेत्र अधिकारी सावली.व श्री.आर डी कोळापे क्षेत्रासहायक सावली.यांची प्रमुख उपस्थिती होती.तर . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पति विभागाचे विभाग प्रमुख वाताखेरे सर यांनी केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इको.प्रो. संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे सर यांनी सांगितले की वाघ हा अन्न साखळीतील सर्वात वरचा प्राणी आहे तो जर टिकवून ठेवले तर जंगल जंगलातील सर्व प्राणी व जंगल टिकून राहनार, निसर्गाशिवाय मानवाचं अस्तीत्व नाही म्हणून निसर्गाला जोपासा असा महत्वाचा संदेश त्यांनी वन्यजीव सप्ताहचा निमित्ताने दिला.कार्यक्रमाचे .संचालन प्रा.स्मिता राऊत मॅडम व आभार डॉ सचिन चौधरी सर यांनी मानले. व शेवटी वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावली वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजूरकर सर, क्षेत्रसहायक कोळापे सर,वनरक्षक,इको.प्रो.चे सदस्य, वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. देवीलाल वताखेरे सर, डॉ.सचिन चौधरी सर, प्रा.स्मिता राऊत मॅडम. श्री गिरीश डोंगरे ,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.