धानोरा /भाविक करमनकर 

 

स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालयाच्या निर्देशानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंकज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समान संधी केंद्राची स्थापना करून कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी मंचावर प्राध्यापक डॉक्टर गणेश चुदरी प्राध्यापक डॉक्टर पंढरी वाघ प्राध्यापिका डॉ. विना जांबेवार प्राध्यापक ज्ञानेश बनसोड इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती या प्रसंगी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी समान संधी केंद्र सुरू करण्यात आली सदर केंद्राद्वारे शासनाची विविध ध्येयधोरणे योजना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांच्या समाजातील दुर्लक्षित घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या केंद्रामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहे यावेळी समान संधी केंद्राचे उद्देश कार्य आणि भूमिका याविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गणेश चुदरी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले यावेळेस बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. 

समान संधी केंद्र कार्यकारिणी गठित पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पंकज चव्हाण समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गणेश चुदरी सदस्य प्राध्यापक डॉक्टर पंढरी वाघ सदस्य प्राध्यापिका डॉक्टर विना जांबेवार सदस्य प्राध्यापक डॉक्टर डी बी झाडे प्राध्यापक ज्ञानेश बनसोड प्राध्यापिका डॉक्टर प्रियंका पठाडे प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार प्राध्यापक बी पी करमनकर विद्यार्थी प्रतिनिधी मध्ये कुमारी मनीषा जाडे बी.एस थर्ड इयर रितिक कोसरे बीए थर्ड इयर साहिल बडोले बीएससी थर्ड इयर कुमारी निकिता उईके बीएससी थर्ड इयर विवेक शेडमाके बीए सेकंड ईयर कुमारी मनीषा गावडे बीए सेकंड ईयर कुमार शुभमंगना मोडघरे बीएससी सेकंड ईयर कुमारी करीना वरवाडे बीएससी सेकंड ईयर कुमारी प्राची बडोले बीए फस्ट इयर लखन वाढई बीए फर्स्ट इयर मंथन गावतुरे बीएससी फर्स्ट ईयर कुमारी प्रतीक्षा भेंडारे बीएससी फर्स्ट ईयर.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com