कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण चे पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी लुटमार व चोरी चे दोन आरोपी पकडुन त्याच्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहना सह एकुण ४०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले .

कन्हान परिसरात आणि नागपूर ग्रामीण जिल्हयात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लुटमार व चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा.चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार पोस्टे कन्हान ला अप.क्र ४८०/२२ कलम ३९२ , ३४ भांदवि आणि अप.क्र ५४५/२२ कलम ३७९ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा असल्याने आरोपीचा शोध कामी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस दि.६ आॅक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीत दाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की , आरोपी नामे १) पंकज चंद्रभान सतापे , २) सादिक सलीम शेख , दोन्ही राहणार खदान नंबर ३ कन्हान यांनी लुटमार व चोरी च्या घटनेला अंजाम दिले आहे .

अशा प्राप्त खबरेची पळताळणी पोलीसांनी केली असता पोलीसांनी आरोपी नामे १) पंकज चंद्रभान सतापे , २) सादिक सलीम शेख यांना पकडुन त्याच्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहना सह एकुण ४०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले .

सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलिस अधीक्षक मा.विजयकुमार मगर , अप्पर पोलिस अधीक्षक मा.राहुल माखिनिकर यांच्या मार्गदर्शनात , गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा आदेशानुसार , सपोनि अनिल राऊत , पोहवा विनोद काळे , ज्ञानेश्वर राऊत , अरविंद भगत , पोना शैलेश यादव , प्रणय बनाफर , वीरेंद्र नरड , सतीश राठोड , मुकेश शुक्ला सह आदि कर्मचार्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News