पारशिवनी : – ६६ वा धम्म चक्र परिवर्तन दिवस महोत्स वा निमित्य वाघोली गावात पहिल्या दिवसी प्रबोधना चा कार्यक्रम व दुस-या दिवसी नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वर भव्य भोजनदान करून भारतीय बौद्ध महासभा व्दारे दोन दिवसीय धम्म महोत्सव साजरा करण्यात आला.  

       भारतीय बौद्ध महासभा व्दारे मंगळवार (दि.४) ऑक्टोंबर ला ६६ वा धम्म चक्र परिवर्तन दिवसाच्या पुर्व संध्येला वाघोली गावात पहिल्या दिवसी प्रसिध्द प्रबोधनकार विजयजी भारती यांचा सामाजिक प्रबो धन कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली. दुस-या दिवसी बुधवार (दि.५) ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वरून नागपुर च्या ऐतिहासिक दिक्षा भुमिवर देश, विदेश आणि विविध राज्यातुन येणा-या धम्म प्रेमी यां करिता सकाळी चना, पोहा चा नास्ता व सकाळी ८ वाजता पासुन वाघोली बस स्टापवर भव्य भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाचा हजारो धम्म प्रेमीनी लाभ घेतला. या कार्यक्रमास वाघोली, गोंडेगाव, घाट रोहणा, वराडा, टेकाडी, नांदगाव, एसंबा, साटक, बन पुरी, तेलनखेड़ी, बोरडा, नीमखेड़ा, गहुहिवरा, खंडाळा, निलज, बखारी, डुमरी, मेहंदी आदी गावा ने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भारतीय बौद्ध महासभा चे ज्येष्ठ नेते श्री सिद्धार्थ कांबळे, सामाजिक समाजसेवक चंद्रमणी पाटिल, प्रयास कांबळे, बाबुला ल प्रसाद, रतन भेलावे, दिवाकर पौनिकर, विनोद रंगारी, शेखर पौनिकर, राजु मेश्राम, दिगांबर ठाकरे, पुंडलिक मेश्राम, प्रकाश वरकडे, सूर्यभान दीपके, देवा डोंगरे उपसरपंच निमखेडा, दिनेश रंगारी, मिलिंद देशभ्रतार सह पदाधिकारी व कार्यकर्ता नी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com