पांडुरंग भोसले
रेडणी प्रतिनिधी..
गिरवी तालुका इंदापूर अंतर्गत पिंपरी बुद्रुक ते गिरवी हा रस्ता डांबरीकर असून या रस्त्यावर संपूर्ण ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य झालेले दिसते आहे.
वाहन चालकांना व ग्रामस्थांना व परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना नेहमीच करावे लागत आहे.
लक्ष्मी नरसिंह देवस्थान या भागाचे कुलदैवत असल्यामुळे भाविक भक्ताना याच रस्त्याने जावे लागत आहे.जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
पावसाळा हंगामात आपघात घडण्या अगोदरच या रस्त्याची दुरुस्ती होऊन पूर्णपणे खड्डे बुजवून घ्यावेत असी संबंध परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
चालु वर्षी ऊस वाहतुकीचा सिजन जवळ आल्याने वाहतूक दारालाही अडचण होऊ नये याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने व सरपंच पांडुरंग डिसले,ऊप सरपंच दादासाहेब क्षिरसागर यांच्या पाठ पुराव्यामुळे रस्त्याच्या कामाला निधी मिळाल्यामुळे हा रस्ता पहिल्यांदाच डांबरीकरण झालेला आहे.
मात्र गिरवी रस्त्याचे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याच्या कामाची पूर्णपणे चौकशी करावी व कामाचा दर्जा तपासावा आणि पूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवून घेण्यात यावे ही या भागातील ग्रामस्थांची व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची,लक्ष्मी नरसिंहाच्या भाविकांची मागणी आहे.
गिरवी हा रस्ता तयार होऊन गेली चार वर्ष पूर्ण होताच पिंपरी पासून ते गिरवी पर्यंत रस्त्यावर संपूर्ण पणे खड्डे तयार झालेले आहेत.हजारो भावीक व ग्रामस्थांना या रस्त्यावरून जाताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ही बाब बांधकाम विभागाने लक्षात घेऊन तातडीने खड्डे बुजवून घ्यावेत.
पावसाळा हंगाम नुकताच सुरू झालेला आसल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे.