आशिष धोंगडे
जिल्हा प्रतिनिधी वाशीम
वाशिम:- कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा ते शिवण येथील रस्ता कित्येक वर्षापासून रखडलेला आहे.या रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांना अपघाता अंतर्गत सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याने कितीतरी नागरिकांचा बळी घेतलेला आहे.
असे गंभीर घटनाक्रम घडत असताना सुद्धा आतापर्यंत प्रशासनाला या रस्ता बांधकामा बाबत अजून पर्यंत जाग आलेले नाही असे दिसून येते आहे.
बेंबळा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रतिभा विद्यालय शिवन येथे दररोज जाणे येणे करावे लागते.
अशातच पावसामुळे या रस्त्याचे मोठे हाल होऊन विद्यार्थ्यांना जीव वेटीस धरून सायकलने प्रवास करावा लागते आहे .
त्यामुळे बेंबळा येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा सदर रस्ता योग्य करण्यासाठी एल्गार पाहायला मिळत आहे.
जागोजागी खाचखळगे असलेल्या रस्त्यामुळे शिवण गावातील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
प्रतिभा विद्यालय शिवण येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी प्रशासनाला विनंती करून या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे अशा प्रकारची मागणी केली आहे.
मात्र,सदर रस्त्याची हालत खास्ता झाली असताना व या रस्त्यावरून विद्यार्थी,नागरिक यांना मार्गक्रमण करताना नाहक त्रास होत असताना लोकप्रतिनीधींचे व संबंधित जि.प.उपविभागीय बाधकाम विभागाच्या व सार्वजिनक बांधकाम उपविभागीय विभागाच्या अभियंत्यांचे सदर रस्त्याकडे होणारे दुर्लक्ष अतिशय दुःखद आहे.