शिवाजी विज्ञान महाविद्यालयात अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रम संपन्न.

ऋषी सहारे

संपादक

            गडचिरोली _ महाराष्ट्र नरबळी ‘ अमानुष ‘अंधश्रध्दा  अधोरी प्रथा , जादुटोणा विरोधी कार्यक्रम शिवाजी विज्ञान महाविदयालय गडचिरोली येथे प्राचार्य चंद्रकात राऊत यांचे अध्यक्षतेखाली तर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर डोंगरे , नंदिनी जाधव , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सदस्य तसेच भगवान डॉ. चंद्रशेखर डोंगरावर, प्रा. मुनिश्वर बोरकर आदि प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी भगवान यांनी जादुटोणा विषयी काही प्रात्याक्षिक करून दाखविले तर चंद्रशेखर डोंगरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

          याप्रसंगी नंदिनी जाधव यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन करतांना सांगीतले की डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी केलेले अंधश्रध्दा बाबतचे कार्य पुर्ण करावयाचे आहे. खेड्या पाळ्यात , जंगलात ढोंगी. बुवाबाजी , जंतरमंतर वाले भोळ्या भाबड्या आदिवासी भागात बाबा अधोरी कृत्य करतात व आदिवासी बांधवांची फसवणूक करतांत अश्या व्यक्तीचा भांडाफोड करून त्याना तुरंगाची हवा दाखविली पाहीजे. पसरलेली अंधश्रद्धा नष्ट झाली पाहीजे म्हणुन महाराष्ट्र शासनाने २०१3 ला कायदा अन्वये जादुटोणा करणाऱ्यांवर वचक बसावा या उद्देशाने सदर यात्रा संपूर्ण विदर्भात फिरत आहे. याप्रसंगी प्रा. अनिल शेट्टे प्रा. अनिल घामोडे ‘ सरोज सहारे ‘ सहीत बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक ‘ शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार मय्युर मुनघाटे यांनी मानले.