चर्होली बुद्रुक येथे ॲड.कूणाल तापकीर यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली बुद्रुक येथे किसनराव तापकीर सोशल ॲन्ड एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या माध्यमातून या वर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे, रसिका सुनील, सायली देवधर आणि मयुरी उत्तेकर ही कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत असे आयोजक शिवसेनेचे उपशहरप्रमुख ॲड.कुणाल तापकीर यांनी सांगितले.

          चर्होली बुद्रुक येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. माजी नगरसेवक किसनराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षापासून भव्य असा सार्वजनिक दहीहंडी महोत्सव सुरू केला आहे. म्हसोबा मंदिरा जवळ दाभाडे सरकार चौकात हा दहीहंडी कार्यक्रम होतो. गतवर्षीच्या पहिल्याच वर्षी तब्बल २५ हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती. या वर्षी या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. यावेळी दहीहंडी उत्सवात विशाल लाईट, जय गणेश साऊंड, फायर शो तसेच महीला गोविंद पथक हे विशेष आकर्षण असणार आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जास्तीत जास्त युवावर्गाने या दहीहंडी उत्सवासाठी उपस्थितीत राहावे, असे आवाहन ॲड.कुणाल तापकीर यांनी केले आहे.