विनापरवाना अवैद्यरित्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांची मोठी कारवाई.. — सतरा लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त…

ऋषी सहारे

संपादक

 

 निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे/पोमके यांना जनावरांची कत्तलीसाठी होणारी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

             त्या निर्देशानुसार दिनांक ४/९/२०२३ रोजी ट्रकद्वारे गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे, अशी मुखबिरद्वारे बातमी प्राप्त होताच पोउपनि ज्ञानेश्वर धनगर यांनी पोलीस नायक दिनेश राऊत व पोलीस अंमलदार नरेश कुमोटी,विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र.टिएस १२ युए ०७८९ यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये तेलंगना येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेली एकुण १८ गोवंशीय जनावरे मिळून आली.

          त्यामुळे इसम नामे १) मोहम्मद जाकीर मो. इब्राहीम रा. चंगेमुल २) गंजय अरुण किस्टया रा. मेडीपल्ली दोन्ही राज्य तेलंगना ३) नरेश नागदेव पारधी ४) रविंद्र दयाराम कुथे दोन्ही रा. गांधीनगर ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली यांचे ताब्यातील ट्रक क्र. टिएस १२ युए ०७८९ किंमत अंदाजे १६,००,०००/- व १८ गोवंशीय जनावरे किंमत अंदाजे किंमत १,९०,००० /- रुपये असा एकुण १७,९०,०००/- किंमतीचा माल जप्त करुन त्यांचे विरुध्द पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा दाखल केला.

        सदरची कारवाई निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली,अनुज तारे अपर पोलीस अबीक्षक गडचिरोली (अभियान),कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन),साहील झरकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा यांचे मार्गदर्शनात व किरण रासकर पोलीस निरीक्षक पोस्टे देसाईगंज यांचे देखरेखखाली करण्यात आली.

         दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि प्रविण बुंदे हे करत आहेत.