अरमान बारसागडे
तालुका प्रतिनिधी चिमूर
दखल न्यूज भारत
चिमूर – तालुक्यातील अडेगाव (देश) येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच आदिवासी सहकारी सोसायटीचे संचालक, लटारुजी सुर्यवंशी यांची नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बहुमतांनी निवड करण्यात आली.
लटारुजी सुर्यवंशी यांचे सामाजिक कार्याच्या क्षेत्रात मोठे योगदान असून या परिसरामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते मागील ३० वर्षापाून अडेगव ( देश) येथील आदिवासी सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून अविरोध निवडून येतात.
तसेच ते अडेगाव (देश) येथील गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रसार करीत असतात. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.