कन्हान : – अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपुर द्वारे आयोजित वर्ड डांस आँलमपीयाड सिझन ३ मध्ये नेहा प्राथमिक शाळा कन्हान येथील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थींनी सोनाक्षी किरण पेटारे हिने सोलो हिपाॅप या प्रकारात पहिला क्रमांक पटका वत जागतिक नृत्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

       जुलै २०२२ मध्ये अखिल नटराजम आंतर सांस्कृ तिक संघ, नागपुर द्वारे वर्ड डांस आँलमपीयाड सिझन ३ ऑनलाईन पध्दतीने नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या नृत्य स्पर्धेत सोनाक्षी किरण पेटारे हिने सह भाग नोंदवित गोल्ड मेडल मिळवित बँकाॅक (थायलंड) येथे होणाऱ्या जागतिक डांस स्पर्धेसाठी सोलो हिपाॅप या प्रकारात आपले स्थान निश्चित केले आहे. हि स्पर्धा डिसेंबर २०२२ मध्ये थायलंड येथील बॅंकॉक येथे होणार आहे. तिच्या या यशा करिता नेहा प्राथमिक शाळा व संस्थे व्दारे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रेमलाल रोडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन गौर विण्यात आले, तसेच तिचे डान्स प्रशिक्षक लोकेश राऊत यांचा सुध्दा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक /अध्यक्ष श्री. प्रेमला ल रोडेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. राजेश पेटारे, सदस्य श्री. दिपक गायकवाड, श्री किरण पेटारे, प्रभाकर बावणे, पवन कोचे, सौ. सोनु पेटारे, मालाबाई पुरवळे, अर्चना पात्रे तसेच शिक्षिका मंगला पाहुणे, सुनिता तांदुळकर, वनिता घोडेस्वार व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता तांदूळकर यांनी तर आभार प्रदर्शन मंगला पाहुणे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News