उपसंपादक/अशोक खंडारे
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला .
शिक्षक दिनाचे औचीत्य साधून विद्यार्थ्यासाठी स्वयंशासन कार्यक्रम राबविण्यात आला.एकूण ३० विद्यार्थ्यानी शिक्षकाची भूमिका पार पाडली त्यामधून हाॅयस्कूल गटातून प्रथम क्रमांक खुशाल राउत याने द्वितीय क्रमाक आदित्य कावळे याने तर तृतीय क्रमाक अपूर्व मंडल याने पटकविले तर मिडल स्कूल गटातून प्रथम क्रमाक अनुष्का दुधे हीने द्वितीय क्रमाक प्रथम शेंडे याने तर तृतीय क्रमाक आर्या कुद्रपवार हीने पटकवीला. या सर्व विद्यार्थ्याना स्मृतीशेष सीताराम बोरकुटे यांचे स्मृती पित्यर्थ एन.एस. बोरकुटे मुख्याध्यापक राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) यांचे कडून ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .
सर्व छात्रसंघाचे विद्यार्थ्या कडून शिक्षक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा विद्यार्थ्याच्या हस्ते श्रीफळ व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला .सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक .एन.एस.बोरकुटे हे होते तर प्रमुख अथिती म्हणून आर.आर.सरकार ,एम.एन.सरकार ,एम.बी.भोयर ,आर.पी.लाकडे ,मडावी ,जे.ए.शेख ,डी.एस.नाईकवार,सौ.कल्पना गुंडावर ,उपस्थित होते. विध्यार्थ्यांच्या सत्काराला उत्तर म्हणून मुख्याध्यापक एन.एस,बोरकुटे ,आर.आर.सरकार,एन .डब्लू .शहरे इत्यादी शिक्षकानी मार्गदर्शन केले .तसेच आकाश गलबले ,हर्षल गलबले,सजीवणी चांदेकर ,करण चलावार ,अपूर्व मंडल ,पूजा भोयर ,भग्यश्री भोयर ,इत्यादी विद्यार्थ्या नी शिक्षक दिन कार्यक्रमा निमित्य भाषणे दिली .
कर्यक्रमाचे संचालन शाळाप्रमुख खुशाल राउत याने तर प्रस्ताविक हर्षद गलबले .यांनी केले व आदित्य कावळे .याने सर्व पाहुण्यचे व विद्यार्थ्याचे आभार मानले कर्यक्रमाचे यशस्वीते साठी छात्रसेनेचे प्रतिनिधी व सर्व विद्यार्थ्यानी मोलाचे सहकार्य केले.