सावली (सुधाकर दुधे)
रस्त्याच्या वादावरून लहान भावाने मोठा भाऊ व वहिणीची खुन केला ,या दुहेरी हत्याकांडातील आरोपी धनराज गुरुनले याला सावली येथील न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन दिवसाची तर या हत्याकांडात आरोपी धनराज गुरनुले चा मुलगा सुध्दा सामील आहे ,असे तपासाअंती निष्पन्न झाल्याने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली.
सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायडोंगरी येथे दुहेरी हत्याकांड घडुन आला,यात मनोहर निंबाजी गुरुनले व शारदा मनोहर गुरुनले.या पती पत्नीचा जीव गेला, मृतकाचा भाऊ धनराज गुरुनले व मृतकात नेहमीच रस्त्याच्या जागेवरून वाद होत होता ,घटनेच्या दिवशी मोठ्या व लहान भावांमध्ये रस्त्याच्या जागेवरून कडाक्याचे भांडण झाले, त्यात लहान भावाने मोठा भाऊ व वहिनी ला सबलीने मारहाण केली यात मोठा भाऊ जागीच ठार झाला तर वहिणीचा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे मृत्यु झाला यात ,लहान भावाला पाथरी पोलींसानी तात्कळ अटक केली व त्याला सावली न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, त्यातच पाथरी पोलिसांनी हत्याकांडात पुन्हा वेगळी चक्रे फिरवली असता आरोपी धनराज गुरुनले चा मुलगा अंकुश धनराज गुरुनले हा सुध्दा.या हत्याकांडात सामील असल्याचे तपासा अंती निष्पन्न झाले, याला (दि 6 सप्टें) ला पाथरी पोलीसांनी अटक करुन आज सावली न्यायालयात हजर केले असता मुलाला दोन दिवसाची पोलीस कोठरी देण्यात आली,
आरोपी विरुद्ध 302,307 आय पी सी अंतगर्त कारवाई करण्यात आली,पुढील तपास पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात नारायण येगेवार,अशोक मोहुर्ले,वसंत नागरीकर,सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे,जनार्दन मांदाळे,राजु केवट आदी पोलीस कर्मचारी करीत आहेत