माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवारांची पदाधिकाऱ्यांसह साखळी उपोषणाच्या स्थळी भेट..

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

        राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूर अंतर्गत भ्रष्टाचार करणाऱ्यांना शोधून काढा व त्यांना अटक करा,या मागणीला अनुसरून अन्याय निवारण समितीचे सदस्य चिमूर तहसील कार्यालया समोर साखळी उपोषणाला मागील १० दिवसांपासून बसले आहेत.

          संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारातंर्गत समस्या व वास्तव समजून घेण्यासाठी माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह चिमूर तहसील कार्यालया समोर सुरू असलेल्या,”अन्याय निवारण समिती अंतर्गत सदस्यांच्या, साखळी उपोषण स्थळी जाऊन प्रत्यक्ष भेट आज घेतली.

            साखळी उपोषण कर्त्यांसी त्यांनी संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणा संबधाने सखोल चर्चा केली व आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समजून घेतले व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसी चर्चा करून आर्थिक गैरव्यवहार प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

             साखळी उपोषण स्थळी भेट देताना माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार,प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल धनराज मुंगले,काॅंग्रेसचे जेष्ठ नेते भिमराव ठावरी,काॅंग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे,माजी जि.प.सदस्य गजानन बुटके,ओबीसी सेलचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस राजू लोणारे,जेष्ठ कार्यकर्ते कृष्णाजी तपासे,जेष्ठ नेते राजूभाऊ दांडेकर,जावा भाई,व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.