प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेमकांत वाकडे (प्राचार्य) कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर, रविंद्र पडवेकर (मुख्याध्यापक) नूतन माध्यमिक विद्यालय चंद्रपूर यांची उपस्थिती होती. सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. तसेच छात्रध्यापक व छात्रध्यापिकांनी थोर समाजसुधारक व आदर्श शिक्षकांच्या विविध वेशभूषेत आपली भूमिका मांडली तसेच बौध्दिक खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन छात्रध्यापिका विणा पिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापिका वनिता हलकरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाकरीता बी. एड. प्राध्यापक वृंद प्राध्यापिका सूचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपुडके, प्राध्यापिका प्रगती बच्चूवार, प्राध्यापिका शमिना अली तसेच ग्रंथपाल चंदन जगताप, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोरेश्वर गाऊत्रे, विजय बाळबुधे तसेच छात्रध्यापक व छात्रध्यापिका उपस्थित होते.